उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती सुधारावी व कोरोनामुक्त व्हावे यासाठी देवाला साकडे
जळोची येथे महाकालेश्वर चरणी दुग्ध अभिषेक घालून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती सुधारावी व कोरोनामुक्त व्हावे यासाठी देवाला साकडे
जळोची येथे महाकालेश्वर चरणी दुग्ध अभिषेक घालून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना.
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजितदादा या कोरोनाच्या संकटातून बाहेर यावे यासाठी राज्यभरातून त्यांचे कार्यकर्ते प्रार्थना, नवस, करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
दरम्यान आज दि.30 रोजी जळोची (ता.बारामती) येथील महाकालेश्वर चरणी दुग्ध अभिषेक घालून अजितदादांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी व त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी कार्यकर्त्यांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली.
यावेळी दत्तात्रय माने,प्रताप पागळे,सावता गोरे, मच्छिंद्र शेंडगे, दिलीप जमदाडे, सागर शिंदे, अभिमन्यू काळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.