उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इब्राहीम अल्काझी यांना श्रद्धांजली.
भारतीय नाट्य आणि कलासृष्टी समृद्ध करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इब्राहीम अल्काझी यांना श्रद्धांजली.
भारतीय नाट्य आणि कलासृष्टी समृद्ध करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
मुंबई दि. ४ : ख्यातनाम नाट्यकर्मी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक, पद्मविभुषण इब्राहीम अल्काझी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून भारतीय नाट्य, कलासृष्टीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी इब्राहीम अल्काझी यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, पुणे येथे जन्मलेल्या इब्राहीम अल्काझी यांचं पुण्याशी, महाराष्ट्राशी आणि मराठी भाषेशी विशेष नातं होतं. देश पातळीवर काम करताना त्यांनी अनेक प्रतिभासंपन्न कलाकार घडवले. भारतीय नाट्य आणि कलासृष्टी समृद्ध करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. भारतीय कलाक्षेत्राला त्यांनी दिलेला जागतिक दृष्टिकोन, त्यांनी घडविलेल्या कलाकारांच्या पिढ्या त्यांची स्मृती चिरंतन ठेवतील. इब्राहीम अल्काझी या महान कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली.