
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर
अकरा विविध कार्यक्रमांना भेट देणार
बारामती वार्तापत्र
आज बारामतीच्या दौऱ्यावर असून सकाळपासून अजितदादांनी शारदा नगर येथील रस्त्याच्या कामाची चर्चा केली त्यानंतर करा नदी सुशोभीकरण व दशक्रिया विधी घाटाची पाहणी केली त्यानंतर जनहित प्रतिष्ठान च्या ज्ञानप्रबोधिनी हायस्कूल व परकाळे बंगला येथील नगर परिषदेतर्फे सुरू असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास भेट दिली.
आज अजितदादांच्या हस्ते स्वराज ट्रॅक्टर या शोरूमचे उद्घाटन होणार असून, त्यानंतर सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयाशेजारी रक्तपेढीसमोर फुटवेअर म्युझियम या दुकानाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर सव्वानऊ वाजता राठी स्टाईल अँड एलिगन्स या कापड शोरूमचे उद्घाटन करणार असून, सकाळी दहा वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सिटीस्कॅन मशिन चे उद्घाटन करणार आहेत. त्याचबरोबर आयसीयू युनिट व पेडियाट्रिक वॉर्डची ते पाहणी करणार आहेत.
यानंतर ते नेहमीप्रमाणे विद्यापीठांच्या माहिती व तंत्रज्ञान सभागृहात कोरोना विषाणू प्रादुर्भाव याच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी तीन वाजता ते सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचार सभेस संबोधित करणार आहेत. वाघळवाडी येथील अक्षय गार्डन येथे हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी निरा येथील रॉयल चॉईस या कापड दुकानात ते भेट देणार आहेत. तेथून ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत भेट देणार आहेत.