उपमुख्यमंत्री अजित पवार आता सासरे होणार,जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या साखरपुड्याची तारीख आली समोर
डिसेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती?

उपमुख्यमंत्री अजित पवार आता सासरे होणार,जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या साखरपुड्याची तारीख आली समोर
डिसेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती?
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता सासरे होणार आहे. अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ऋतुजा पाटील या पवार घराण्याच्या सून होणार आहे.
खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी जोडीचा फोटो शेअर करून माहिती दिली आहे.
विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता पवार घरात सनईचे सूर घुमणार आहे. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं लग्न ठरलं आहे. जय पवार तसे राजकारणापासून दूरच राहिले आहे. उद्योग क्षेत्रात जय पवार यांना विशेष गती आहे. काही वर्षे दुबईत त्यांनी व्यवसाय केल्याचं सांगितलं जातं. परंतु गेले काही वर्षे ते मुंबई आणि बारामतीतच असतात. सध्याही ते व्यवसाय सांभाळत असल्याचं सांगितलं जातं. त्यांचं लग्न हे ऋतुजा पाटील यांच्याशी ठरलं आहे.
कोण आहे ऋतुजा पाटील?
जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर आता दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी ट्रॅव्हल्सचे पाटील यांच्या घराच्या सुनबाई आहे. जय आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा हा १० एप्रिल रोजी ठरला आहे. तर लग्न हे डिसेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पवार कुटुंबात आनंदाचे क्षण
दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यामुळे उभी फूट पडली आहे. अजित पवार आणि काका शरद पवार हे वेगवेगळे झाले आहे. पण आता या आनंदाच्या क्षणी दोन्ही सगळे रुसवे फुगवे, मतभेद बाजूला ठेवून पवार कुटुंब एकत्र येण्याची परंपरा आहे. आताही जय पवार यांचे लग्न ठरलेले असताना नवी जोडी आजोबा शरद पवार आणि आजी प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेण्याकरिता त्यांच्या निवासस्थानी गेली. दोघांनीही आजी-आजोबांचे आशीर्वाद घेतले. खुद्द सुप्रिया सुळे यांनी दोघांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली.