उपमुख्यमंत्र्यांच्या यांच्या हस्ते धुमाळवाडी येथील रघुनंदन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतींचे उद्घाटन
रघुनंदन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना होऊन वीस वर्ष झालीत
उपमुख्यमंत्र्यांच्या यांच्या हस्ते धुमाळवाडी येथील रघुनंदन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतींचे उद्घाटन
रघुनंदन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना होऊन वीस वर्ष झालीत
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील रघुनंदन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पार पडले.
यावेळी बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समिती सभापती नीती फरांदे, जिल्हा परिषद सदस्य विश्वास देवकाते, रघुनंदन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव धुमाळ, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, एकात्मिक विकास समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, पंचायत समितीचे उपसभापती रोहित कोकरे, सरपंच कविता सोनवणे ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. पवार म्हणाले , रघुनंदन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना होऊन वीस वर्ष झालीत. संस्थेचे काम उत्कृष्टपणे चालले असून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सर्वांनी काम करावे. शेतकऱ्यांना कमीत कमी त्रास होईल अशी मदत करावी. भविष्यात संस्था असेच पारदर्शक काम करुन यशाचे शिखर गाठेल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.