उपमुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्याच्या टूव्हीलरची केली पूजा…
सामान्य कार्यकर्त्यांच्या प्रती असणाऱ्या आस्थेचा आला प्रत्यय...
उपमुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्याच्या टूव्हीलरची केली पूजा…
सामान्य कार्यकर्त्यांच्या प्रती असणाऱ्या आस्थेचा आला प्रत्यय…
बारामती वार्तापत्र
बारामती-अलीकडील बदलत्या काळात एखादे मोठे वाहन घेतल्यास त्या वाहनाची मोठ्या व प्रतिष्ठित व्यक्तीच्या हातून पूजा करण्याचे फॅड आले आहे. मात्र कार्यकर्त्यांसाठी नेहमीच तत्पर असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्याच्या इच्छेखातर त्याच्या टू व्हीलर गाडीची हार घालून पूजा केली.
महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी छाप व दबदबा असणारे तसेच सामान्य कार्यकर्त्यांचे थेट म्हणणे समजून घेणारे राज्यातील एकमेव नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार होय. चांद्यापासून बांद्यापर्यंत सामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जोडणारे नेते म्हणून पवारांकडे पहिले जाते. याचाच प्रत्यय काल बारामतीकरांनी अनुभवला.काल बारामती येथील राष्ट्रवादी भवन पक्षाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. कार्यालयातील बैठक संपल्यानंतर ते बाहेर पडत असताना. एका कार्यकर्त्याने ‘दादा’ मी टू व्हीलर घेतलीये… पूजा कराल काय.. यावर क्षणाचाही विलंब न करता पवार यांनी थेट कार्यकर्त्याच्या गाडीजवळ जात गाडीला हार घालायला सुरुवात केली. हे पाहून उपस्थित कार्यकर्ते आश्चर्यचकित झाले. गाडीची पूजा करून पवार यांनी संबंधित कार्यकर्त्याला सावकाश गाडी चालवण्याचा सल्ला दिला.अजित पवारांची सर्वसामान्यांच्या प्रति असणाऱ्या या आस्थेमुळेच त्यांना प्रत्यक्ष आमदारकीसाठी प्रचार करावा लागत नाही. कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकच स्वतः उमेदवार असल्याचे समजून बारामती मतदार संघात काम करतात. आणि म्हणूनच ते राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतात.