उपमुख्यमंत्र्यांनी दिले पवार शैलीत संजय राऊतांना उत्तर….
... म्हणाले सरकारमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये

उपमुख्यमंत्र्यांनी दिले पवार शैलीत संजय राऊतांना उत्तर….
… म्हणाले सरकारमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये
बारामती वार्तापत्र
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अपघाताने गृहमंत्रीपद दिल्याचे विधान संजय राऊत यांनी केल्यानंतर आज बारामती येथे पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या विषयी विचारले असता ते म्हणाले की,महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये.
हे तीन पक्षांचं सरकार असून कुणाला मंत्री करायचं हा तीन्ही पक्षाच्या प्रमुखांना अधिकार आहे. राष्ट्रवादीत कोणाला मंत्री करायचं हा शरद पवार यांचा अधिकार आहे. हे तीन पक्षाचं सरकार असताना या पक्षांशी संबंधित व्यक्तींनी एकमेकांना अडचणीत आणणारी वक्तव्य करु नये. शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत, मंत्री कोण असावेत हे ठरवलं आहे. त्यामुळं महाविकासआघाडी एकत्रित काम करत असताना कुणीही त्यात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवार शैलीत राऊत यांना सुनावले.
तसेच पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्क वापरावरून नाराजी व्यक्त केली.ते म्हणाले की,अजूनही लोक मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन वेगाने काम करत असताना मात्र नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.