उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा शिवसेने च्या वतीने जाहीर निषेध.
तहसील कार्यालय बारामती येथे आंदोलन संपन्न.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा शिवसेने च्या वतीने जाहीर निषेध
तहसील कार्यालय बारामती येथे आंदोलन संपन्न.
बारामती:वार्तापत्र
राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती श्री. व्यंकय्या नायडू यांच्या चेंबरमध्ये पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र व जय भवानी, जय शिवाजी. असा उल्लेख केला व त्या वाक्याला व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेत माझ्या चेंबरमध्ये अशा घोषणा चालणार नाही, तुम्ही नविन आहात म्हणून समज देतो अशी समज दिली.
सदर समज नसून छत्रपती शिवराय व महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असल्याचे सांगत शिवसेने च्या वतीने बारामती तहसील कार्यालय येथे आंदोलन करून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा निषेध करण्यात आला.
जिल्हा प्रमुख मा. श्री. राजेंद्रभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय बारामती येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी जय भवानी जय शिवाजी, व्यंकय्या नायडू मुर्दाबाद, अशा घोषणा देऊन, श्री व्यंकय्या नायडू यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी यासाठी मा. तहसीलदार साहेब यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख विश्वास मांढरे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, विधानसभा क्षेत्र प्रमुख नीलेश मदने, उपतालुका प्रमुख सुभाष वाघ, अजित जगताप, शहर प्रमुख पप्पू माने, भीमराव भोसले, सर्वेश वाघ, रंगनाथ निकम, दत्ता भोसले, विजय हिरवे, कल्याण जाधव, संदीप तावरे, गजानन रायते, निखिलजी देवकाते. आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सोशलडिस्टन्सिंग चे पालन करून, उपस्थित होते..