क्राईम रिपोर्ट
उरळीकांचनमध्ये थरारक घटना 5 जणांमध्ये गोळीबार 2 जणांचा मृत्यू
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फायरिंगची घटना घडली.
उरळीकांचनमध्ये थरारक घटना 5 जणांमध्ये गोळीबार 2 जणांचा मृत्यू
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फायरिंगची घटना घडली.
पुणे – प्रतिनिधी
लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गँगवॉरचा थरार पाहायला मिळाला आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फायरिंगची घटना घडली. गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये झालेल्या फायरिंगमध्ये संतोष जगताप यांचा मृत्यू झाला आहे.
गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये झालेल्या फायरिंगमध्ये तिघे जण गंभीररित्या जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामधील दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते. अप्पा लोंढे गँग आणि त्याच्या विरुद्ध असलेल्या एका टोळीमध्ये हे फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे.
- वाळूच्या ठेकेदारीवरून गँगवॉर –
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे गँगवार भडकल्याची चर्चा सध्या आहे. भरदिवसा पुण्यातील लोणी काळभोर परिसरात ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.