ऊर्जा मंत्र्यांसह महावितरणच्या संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा मनसेची मागणी
पोलिसांना आज मनसेचे बारामती शाखेच्या वतीने निवेदन
ऊर्जा मंत्र्यांसह महावितरणच्या संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा मनसेची मागणी
पोलिसांना आज मनसेचे बारामती शाखेच्या वतीने निवेदन
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आज बारामती मध्ये डी वाय एस पी बारामती ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर पो स्टे ,बारामती ग्रामीण पो स्टे यांना निवेदन देणेत आले . यामध्ये राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, सचिव व कार्यकरी संचालक महावितरण यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हा संगनमत करून मानसिक ल्केश आर्थिक फसवणूक केले बाबत दाखल करावा या मागणीचे निवेदन देणेत आले.
कोरोना काळात जास्तीचे विज बिल महाराष्ट्रा मधील जनतेला दिले आहे व देत आहेत यावर राज ठाकरे यांनी ऊर्जा मंत्र्यांन कडे विज बिल कमी करणे बाबत पाठपुरावा करून देखील केवळ खोटी आश्वासने दिली व महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली अशा स्वरूपाचे निवेदन देणेत आले.
कोरोना लॉकडाउनच्या काळात कठोर टाळेबंदी करण्यात आली होती. या दरम्यान सामान्य नागरिक घरी बसून होता. त्यावेळी वीज वितरण कंपनीच्या वतीने प्रत्यक्ष रिडींग न घेता सरासरी पद्धतीने विज बिल देण्यात आले आहे. लॉकडाऊन च्या काळात कामगारांच्या नोकऱ्या गेल्या, पगार निम्म्याहून अधिक कपात केले. अशा परिस्थितीत वीज बिल मात्र अव्वाच्या सव्वा महावितरण कडून ग्राहकांना पाठविण्यात आले.
या विषयावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री ,ऊर्जामंत्री, यांच्याशी बैठका द्वारे चर्चा केली. त्यावर ऊर्जा मंत्र्यांनी या बिलांमध्ये ग्राहकांना सूट देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी कोणतेही आश्वासन न पाळता सरधोपट पणे ग्राहकांना बिल देऊन ग्राहकांचे मानसिक खच्चीकरण व मानसिक त्रास दिला आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्री ,सचिव ,वीज वितरण चे संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज बारामती मनसेच्या वतीने करण्यात आली.
या वेळी अँड विनोद जावळे पुणे जिल्हा अध्यक्ष अँड पोपट सूर्यवंशी उप जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश पवार शहर अध्यक्ष चंद्रकांत दादा भोसले उप शहर अध्यक्ष संग्राम चांदगुडे उप तालुका अध्यक्ष योगेश पवार अंजली मॅडम शहर अध्यक्ष उपस्तित होते .