ऊस तोड मजुरांच्या चार गाड्यांना अपघात
एकाचा मृत्यू ,तर तीन जण जखमी
बारामती वार्तापत्र
छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे ऊसतोड मजुरांच्या बैलगाडीचा बेलवाडी येथील खारओड्या नजीक पहाटे साडेपाचच्या सुमारास अपघात होऊन भाऊराव उत्तम कांबळे 32 या ऊस तोड मजुराचा जागेवरच मृत्यू झाला व इतर दोन पुरुष व एक महिला या जखमी झाल्या असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक बैल अंत्यवस्त आहे त्याच्यावर सणसर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नलगे यांनी औषध उपचार केले.
बारामती इंदापूर रोडवर पहाटे साडेपाच वाजता झालेल्या अपघातात बारामती कडून इंदापूर कडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने एक गाडी बैलांसह पुलावरून खाली पडली तर दुसर्या गाडीतील भाऊराव कांबळे हे गाडीला धक्का लागून उडून टेम्पो च्या चाकाखाली आले. पाठीमागील चार गाड्यांना टेम्पोने धडक दिली अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक टेम्पो घेऊन पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर झाला या सर्व गाड्या छत्रपती कारखान्याला उसाचा पुरवठा करत होत्या अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी कारखान्याचे वतीने मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे, सुरक्षा अधिकारी दत्तात्रय पिसे, गॅरेज इन्चार्ज गजानन कदम ,रामदास निंबाळकर ,अमरसिंह निंबाळकर सणसर चे माजी उपसरपंच अक्षय काटकर यांनी जखमींना तातडीने दवाखान्यात नेणे कामी मदत केली.