‘ऎश्वर्या बेकरीकडून’ ‘नटराज संचलीत’ कोव्हिड सेंटर्स मधिल रुग्णांसाठी गव्हांकुराची सात्विक बिस्कीटे सुपूर्त.
कोरणा महामारीच्या काळामध्ये संपूर्ण जग अतिशय कठीण प्रसंगातून जात आहे.

‘ऎश्वर्या बेकरीकडून’ ‘नटराज संचलीत’ कोव्हिड सेंटर्स मधिल रुग्णांसाठी गव्हांकुराची सात्विक बिस्कीटे सुपूर्त.
कोरणा महामारीच्या काळामध्ये संपूर्ण जग अतिशय कठीण प्रसंगातून जात आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह, तारांगण महिला वसतिगृह, टीसी कॉलेज मुलींचे वसतिगृह, राजमाता अहिल्यादेवी होळकर वस्तीगृह, रयत भवन, विद्या प्रतिष्ठान मुलांचे व मुलींचे वसतीगृह या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकरिता कोविड केअर सेंटर चालविले जात आहे. यामध्ये साधारण १००० रुग्ण याठिकाणी उपचार घेत आहेत. येथील रुग्णांचे आरोग्य चांगले रहावे, रुग्णांना कोरोना पासून मुक्ती मिळावी यासाठी रुग्णांना ऐश्वर्या बेकरीचे सर्वेसर्वा महेशजी साळुंके यांनी गव्हांकुराची सात्विक बिस्किटे नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण दादा गुजर यांच्याकडे सुपूर्त केली आहेत.
सध्याच्या कोरणा महामारीच्या काळामध्ये संपूर्ण जग अतिशय कठीण प्रसंगातून जात आहे. अशावेळी माणुसकीच्या भावनेतून गेली एक वर्ष नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने किरण दादा गुजर व त्यांची संपूर्ण टीम जे कार्य करीत आहे. त्या कार्यामध्ये आपणही सहभागी असावे या जाणिवेतून महेशजी साळुंके यांनी रुग्णांची गरज ओळखून ही मदत दिली आहे. याबद्दल नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण दादा गुजर यांनी महेश साळुंके यांचे आभार व्यक्त केले.