एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?; चंद्रकांत पाटील म्हणाले…

उत्तर महाराष्ट्रातील काही नेते व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?; चंद्रकांत पाटील म्हणाले…

उत्तर महाराष्ट्रातील काही नेते व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

कोल्हापूर:बारामती वार्तापत्र रिपोर्ट

‘एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ आणि जुने-जाणते नेते आहेत. पक्षाने आतापर्यंत त्यांना भरभरून दिलं आहे. त्यामुळं भाजपचं नुकसान होईल अशी कोणतीही भूमिका ते घेणार नाहीत,’ असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मराठा समाजाच्या राज्य सरकारनं घेतलेल्या काही निर्णयाच्या अनुषंगानं बोलण्यासाठी आज त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी त्यांनी खडसे यांच्याबद्दलही प्रतिक्रिया दिली. भाजपमध्ये आपल्याला सातत्यानं डावललं जात असल्याची एकनाथ खडसे यांची भावना आहे. त्यातून ते अस्वस्थ आहेत. खडसे यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ले चढवत आहेत. काल आलेले लोक आम्हाला अक्कल शिकवत आहेत, असा टोला त्यांनी काही दिवसांपूर्वी हाणला होता. ‘भाजपची सत्ता जाण्यासाठी ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा जबाबदार आहे का याचा अभ्यास मी करतोय, असंही ते म्हणाले होते. फडणवीसांना लक्ष्य करून खडसे यांनी पक्ष सोडण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे.

उत्तर महाराष्ट्रातील काही नेते व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यात खडसे यांचं नाव प्रमुख आहे. याबद्दल चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, खडसे असं काही करणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘नाथाभाऊंच्या बद्दल यापूर्वी अनेकदा अशा चर्चा झाल्या होत्या. मात्र, त्या अफवाच ठरल्या होत्या. आताची चर्चा देखील अफवाच ठरेल,’ असं पाटील म्हणाले.

‘ओबीसी समाजाला मिळणारे सर्व लाभ मराठा समाजाला मिळावेत ही भाजपची मागणी होती, त्यानुसार महाविकास आघाडीने मराठा समाजासाठी अनेक चांगले निर्णय घेतले, त्याचे आम्ही स्वागत करतो. आता फक्त त्याची अंमलबजावणी व्यवस्थित करावी, असं पाटील यावेळी म्हणाले. ‘सरकारनं दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची जबाबदारी दोन मंत्र्यांनी घ्यावी आणि सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा धाव घेऊन हे आरक्षण मंजूर कसे होईल यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

‘सध्या दहा टक्के सवलती आर्थिक मागास वर्गाला दिल्या जातात, त्या सवलती मराठा समाजाला मिळाव्यात. पूर्ण झालेली प्रवेश प्रक्रिया स्थगित न ठेवता मराठा समाजालाही त्यात सामील करून घ्यावे. म्हणजे नव्याने प्रक्रिया करून वेळ जाणार नाही. प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ टाळण्यासाठी सरकारने काही नवीन निर्णय घेण्याची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!