एकाच कुटुंबातील पाच जण तडीपार
दारुविक्री करणारी टोळी
बारामती वार्तापत्र
अवैध दारू विक्री, तसेच गुटखा विक्री ,विनयभंग, बेकायदा जमाव जमून समाजात दहशत निर्माण करणे या प्रकारावरून काझड, तालुका इंदापूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना तडीपार करण्यात आले आहे.
वालचंद नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून काझड तालुका इंदापूर येथील सौ ललिता कांतीलाल भारती, (टोळी प्रमुख ) प्रदीप कांतीलाल भारती ,संदीप कांतीलाल भारती, सोनल संदीप भारती, कांतीलाल बाळू भारती हे एकाच कुटुंबातील पाच जण बेकायदेशीररित्या दारूविक्री करत असून तसेच राज्यात बंदी असलेला गुटखा विक्रीचा व्यवसाय, विनयभंग, मारहाण करून समाजात त्रास देत असल्यावरून वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस अधीक्षक यांच्याकडे तडीपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. तो प्रस्तावा वर कारवाई करून पोलिस अधीक्षकांनी सदरच्या पाचही व्यक्तींना बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर या तालुक्यात तीन महिन्यांकरिता हद्दपार केलेले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, डीवायएसपी नारायण शिरगांवकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार यांनी ही कारवाई केली त्यामुळे परिसरातून व तालुक्यातून वालचंद नगर पोलीसांचे कौतुक केले जात आहे