एका शेतकऱ्याच्या पाच मुलींनी कौतुकास्पद कामगिरी
५ वी नंतर घरीच अभ्यास करून शेतकऱ्याच्या पाचही मुली झाल्या RAS अधिकारी

एका शेतकऱ्याच्या पाच मुलींनी कौतुकास्पद कामगिरी
५ वी नंतर घरीच अभ्यास करून शेतकऱ्याच्या पाचही मुली झाल्या RAS अधिकारी
बारामती वार्तापत्र
मनात इच्छाशक्ती असेल तर काहीही करता येते, हे राजस्थानच्या हनुमानगड या गावातील पाच मुलींनी दाखवून दिले आहे. येथील भैरुसरी या छोट्याशा गावात एका शेतकऱ्याच्या पाच मुलींनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक केले जात आहे.
येथील सहदेव सहारण नावाच्या शेतकऱ्याच्या तीन मुलींची नुकतीच राजस्थान प्रशासन सेवेत (RAS) निवड झाली आहे. या तिनही मुली पाचवीनंतर कधीच शाळेत गेल्या नाहीत. त्यांनी राहत्या घरातूनची शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांची परिस्थिती बिकट होती.
त्यांचे वडील शेती करत होते, आणि वडिलांच्या शेतीतून अत्यल्प उत्पन्न मिळत होते. त्यामुळे शाळेत पाठविण्यासाठी देखील पैसे सहदेव यांच्याकडे नसायचे. पण त्यांच्या मुलींनी मोठ्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केले आहे. आणि आज मोठे यश प्राप्त केले आहे.
सहदेव सहारण यांना पाच मुली आहेत. पाचही मुली सरकारी सेवेत आहेत. एक मुलगी बीडीओ पदावर कार्यरत आहे. तीन मुलींची आरएएसमध्ये निवड झाली आहे. त्यांनी मुलींना केव्हाच शिक्षण घेण्यापासून रोखले नाही. संपूर्ण गावात सहदेव यांच्या मुलींचे कौतुक केले जात आहे.
शेतकरी सहदेव सहारण यांच्या पाचही मुली आता आरएएस अधिकारी आहे. काल रितू, अंशु आणि सुमन यांची निवड झाली. तर दोन मुली या आधीपासूनच सरकारी सेवेत आहेत. सहारण कुटुंब आणि संपूर्ण गावासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.