बारामती येथील भाजी विक्रेते फारूक तांबोळी यांच्या उपचारासाठी मदतीचे आव्हान
सदरचा प्रकार प्रकार लक्ष्मी नगर मधील महिला तरुण व नागरिकांच्या समोर झाल्यामुळे ते अत्यंत भयभीत व भावनिक झाले आहे

बारामती येथील भाजी विक्रेते फारूक तांबोळी यांच्या उपचारासाठी मदतीचे आव्हान
सदरचा प्रकार प्रकार लक्ष्मी नगर मधील महिला तरुण व नागरिकांच्या समोर झाल्यामुळे ते अत्यंत भयभीत व भावनिक झाले आहे
बारामती वार्तापत्र
बारामतील वयोवृद्ध गरीब प्रामाणिक कष्टाळू भाजी विक्रेते फारूक इसाकभाई तांबाळी हे नेहमी प्रमाणे आपली हातगाडी घेऊन लक्ष्मी नगर कसबा येथे भाजी विकत असताना एक विकृत गुंडांने फारुखभाई यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले ते देण्यास नकार दिल्यामुळे त्याने ऍडजेस्टेबल व्हीलपान्याने डोक्यात छोट्या मेंदूच्या उजव्या बाजूला जोरदार प्रहार केला त्यामुळे वयोवृद्ध फारुखभाई जागीच कोसळले लगेच तेथील काही तरुण व महिला भगिनी यांनी फारुखभाई यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला व लगोलग उपचारासाठी आरोग्य हॉस्पिटल बारामती येथे आणण्यात आले.
प्राथमिक उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या असे लक्षात आले की मेंदूवर जोरदार प्रहार झाल्यामुळे ब्रेनच्या ऑपरेशनची आवश्यकता आहे फारुखभाई हे अत्यंत गरीब कुटुंबातील असुन फक्त भाजी विकणे हा त्यांचा व्यवसाय आहे. त्याच्यावर त्याच्या उदह निर्वाह चालतो. त्यांना पत्नी व तीन मोठ्या मुली व एक सहा वर्षाचा छोटा मुलगा आहे तसेच घरात कोणीही कमावती व्यक्ती नाहीये त्यामुळे त्यांना ब्रेन ची सर्जरी करणे व पुढील उपचार घेणे हे खर्चिक असल्याकारणाने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवलेले आहे….
सदरचा प्रकार प्रकार लक्ष्मी नगर मधील महिला तरुण व नागरिकांच्या समोर झाल्यामुळे ते अत्यंत भयभीत व भावनिक झाले आहेत…
लक्ष्मीनगर , कसबा येथील शेकडो नागरिक महिला ,पुरुष , तरुण तसेच अखिल भारतीय मानवी हक्क संघ* पदाधिकारी व तांबोळी समाज अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मुनिर तांबोळी यांनी देखील दोषीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली संबंधित लक्ष्मी नगर येथील जनतेच्या मागणीनुसार बारामती शहर पोलिस प्रशासन तसेच DYSP ..मा.गणेश इंगळे साहेब व बारामती शहर पोलीस स्टेशन चे. PI .मा. सुनिल महाडीक साहेब यांनी आरोग्य हॉस्पिटल येथे येऊन येऊन प्रत्यक्ष पेशंटची पाहणी केली. आणि पिडीत कुटुंबीयांना सहकार्य करण्याच्या व कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या व पुढील तपास API वाघमारे साहेब* करत आहेत.
तसेच तांबोळी कुटुंबीय आणि लक्ष्मी नगर चे रहिवाशी यांना आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासित केले व कलम 307 चा गुन्हा सुध्दा दाखल केला आहे. आणि आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पोलीस बांधवांनी सुद्धा पीडित कुटुंब गरीब असल्याकारणाने त्यांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे …
तरी आपण सजक जागरूक मानवतावादी बारामतीकर या नात्याने या भाजी विक्रेत्याला आर्थिक मदत करून सहकार्य करावे हि नम्र विनंती…
तसेच या पिडीत फारूकभाई तांबोळी बद्दल समाजात फार भावनिक हळहळ व्यक्त होताना दिसत आहे .
तरी भाजी विक्रेते फारूकभाई व त्यांच्या कुटुंबीयांना आपण मदत करुन सहकार्य करावे हि नम्र विनंती ….
टिप…आर्थिक मदत करण्यासाठी गुगल पे किंवा फोन पे करावे.🙏🏻
मदतीसाठी संपर्क
चिऊशेठ जंजीरे
9975913737
आरीफ तांबोळी
9503081109
बापुराव धवडे
8007498522
अक्रम(अक्कु) बागवान
9850296713