दौंड

एकीचे बळ काय असते हे शेतकऱ्यांनी दाखवून दिले.

श्री दत्तगुरु शेतकरी गटाने गटातील शेतकऱ्यांना केले अर्धा तोळ्यांचे अंगठीचे वाटप

एकीचे बळ काय असते हे शेतकऱ्यांनी दाखवून दिले.

श्री दत्तगुरु शेतकरी गटाने गटातील शेतकऱ्यांना केले अर्धा तोळ्यांचे अंगठीचे वाटप

बारामती वार्तापत्र

दौंड तालुक्यातील नानगाव येथील श्री दत्तगुरु शेतकरी गटातील शेतकरी बांधवानी एकीचे बळ काय असते हे दाखवून दिले. गटातील सदस्यांची बचत करून व त्याचा गटाला झालेला फायदा यातुन डिव्हिडंडच्या स्वरूपात गटातील सर्व सदस्यांना धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अर्धा तोळा अंगठीचे वाटप करण्यात आले.
कृषि विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत नानगावचे शेतकरी मित्र प्रगतशील शेतकरी श्री विजय फडतरे व परिसरातील शेतकरी बांधव यांनी एकत्र येऊन गेली ६ वर्षापूर्वी तत्कालीन तालुका कृषि अधिकारी राहुल गायकवाड , तत्कालीन मंडळ कृषि अधिकारी ज्ञानेश्वर आहेरकर व आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्तगुरु शेतकरी गटाची स्थापना केली होती, आजपर्यंत सर्वांनी एकजुटीने एकेमकांवरील दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर गटाची आजची बचत २४ लाख रुपये झाली आहे. गेली ६ वर्षांपासून दरमहा ₹१०००/-प्रती शेतकरी अशी बचत जमा केली जाते. तसेच गटातील सदस्यांना शेतीच्या लागणाऱ्या खर्चासाठी २% दराने कर्जवाटप केले जाते. त्याचा येणारा परतावा दरवर्षी दिवाळीमध्ये वाटप करण्यात येतो त्याच परताव्याचा अनुषंगाने सर्वांनी निर्णय करत आज धनत्रयोदशी चा मुहूर्तावर गटातील प्रत्येक सदस्याला कृषि पर्यवेक्षक संजय फराटे, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर, कृषी सहायक विशाल बारवकर यांच्या हस्ते अर्धा तोळा अंगठीचे वाटप केले. यापूर्वी सुद्धा त्यांनी अशाच प्रकारे अंगठी वाटप केले होते. गटाच्या माध्यमातून आजपर्यंत बांधावर खते वाटप, आत्मा अंतर्गत विविध शेतकरी प्रशिक्षण, अभ्यास दौरे, शेतीशाळा, गट संघटन क्षमता बांधणी प्रशिक्षण, रक्तदान शिबिर अशा प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात आले आहेत.
याप्रसंगी राहु मंडळचे कृषि पर्यवेक्षक संजय फराटे, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर, कृषि सहायक विशाल बारवकर गटाचे अध्यक्ष रामचंद्र खळदकर, सचिव विजय फडतरे, गौतम भोंगळे, , रवींद्र खळदकर, सुभाष टिळेकर, संभाजी गुंड,हनुमंत कुल, चंद्रकांत आहेरकर, रामचंद्र खोतकर, संजय खळदकर, भानुदास खळदकर, हे शेतकरी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!