एक नवे विकासाचे ” स्मार्ट बावडा लाखेवाडी मॉडेल” करणार : अंकिता पाटील.
स्मार्ट व्हिलेज संकल्पनेतून गावांचा विकास करणार असल्याचे केले मत व्यक्त.
एक नवे विकासाचे ” स्मार्ट बावडा लाखेवाडी मॉडेल” करणार : अंकिता पाटील.
स्मार्ट व्हिलेज संकल्पनेतून गावांचा विकास करणार असल्याचे केले मत व्यक्त.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील पिंपरी बुद्रुक येथे दलितवस्ती सुधार योजना अंतर्गत श्रीरामनगर व गायकवाड वस्ती येथील अंतर्गत रस्ता, 14 व्या वित्त आयोगातून अंतर्गत रस्ता व 25/15 निधीतून अंतर्गत रस्ता असे जवळपास 25 लक्ष रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
स्मार्ट व्हिलेज संकल्पनेतून जिल्हा परिषद गटातील सर्व गावांचा एक नवा विकासाचा “स्मार्ट बावडा लाखेवाडी मॉडेल” आपण करणार आहोत. अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण सर्वांच्या दारात पिण्याचे शुद्ध फिल्ट्रेशन चे पाणी उपलब्ध करून देणे, कचरा वर्गीकरण व त्यावरती प्रक्रिया करण्यासाठी प्रणाली, मूलभूत सोयी सुविधा आपल्या ग्रामीण भागात पोचवणार आहोत, असे कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी प्रसंगी सांगीतले.
यावेळी नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्याचे संचालक संजय बोडके, माजी सरपंच आबासाहेब बोडके, प्रदिप बोडके, सुनील बोडके, भगवान काटकर, दादाभाई शेख, वर्धमान बोडके, सतिश बोडके, तुकाराम बोडके, ताजुद्दीन शेख, हनुमंत सुतार, नवनाथ वाळेकर, शंकर लावंड, विस्तार अधिकारी बागल हनुमंत , ग्रामसेवक गणेश लंबाते, राजू शेलार, व्यंकट बोडके, नागनाथ गायकवाड व इतर उपस्थित होते.