एक हजाराची लाच घेताना इंदापूर महसूल विभागाच्या क्लार्क ला रंगेहात पकडले…
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.
एक हजाराची लाच घेताना इंदापूर महसूल विभागाच्या क्लार्क ला रंगेहात पकडले…
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
इंदापूर महसूल विभागाच्या कार्यालयात क्लार्क म्हणून कार्यरत असणाऱ्या नितेशकुमार धर्मापुरीकर यांनी एका ५८ वर्ष तक्रारदार यांच्या जमिनीचे महाराष्ट्र जमिनी महसूल अधिनियम १९६६,चे कलम ८५ प्रमाणे वाटप झाले होते. त्याची नोंद तहसील कार्यालयाच्या एस.आर. रजि.ला घेण्याकरता आरोपीने तक्रारदार यांच्या कडे २ हजार रुपयांची लाच मागणी करुन १ हजार रुपये स्विकारले असता आरोपीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपीस रंगेहात पकडले.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पुणे परिक्षेत्र विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक ज्योती पाटील, पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल शिल्पा तुपे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भापकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत वाळके यांनी केल्याचे समजते.