स्थानिक

एटीएम मध्ये पैसे भरण्याचे ऐवजी तीन कोटी रुपये कर्मचाऱ्यांनी केले हडप

सात जणांवर गुन्हा दाखल

एटीएम मध्ये पैसे भरण्याचे ऐवजी तीन कोटी रुपये कर्मचाऱ्यांनी केले हडप

सात जणांवर गुन्हा दाखल

बारामती वार्तापत्र

एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी एका कंपनीला ठेका दिला होता मात्र या कंपनीतील काम करणाऱ्या सात जणांनी एटीएम पैसे भरण्याचे ऐवजी आपल्याच खिशात पैसे भरल्याची घटना नुकतीच बारामती तालुक्यात घडली. याप्रकरणी संदीप सुधाकर केतकर शाखाधिकारी सिक्युअर इंडिया लिमिटेड कंपनी एरंडवणे ,पुणे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी नितीन बापू चव्हाण अमरसिंह ज्ञानदेव पवार , महेश शिवाजी पवार, तिघे राहणार कोराळे खुर्द बारामती ,अभिषेक चंद्रकांत खरात, स्वप्नील दिनकर अगम, दोघेही कसबा बारामती, विक्रम सुनील भोसले निरावागज ,राजेंद्र बारकू जोगदंड ,आर्वी तालुका दौंड यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्यातील सिक्युअर इंडिया लिमिटेड ही कंपनी विविध बँकांच्या एटीएम मध्ये रक्कम भरण्याचे काम करत असते या कंपनीच्या बारामती शाखेने दोन मार्गावर रक्कम भरण्यासाठी वेगवेगळ्या 54 एटीएम केंद्रावर रक्कम भरण्यासाठी वरील सात आरोपींना दिली होती मात्र एटीएम चे एडमिन कार्ड, पासवर्ड व इतर तांत्रिक गोष्टींचा वापर करत 14 ऑक्टोबर 2020 रोजी बारामतीतील एका एटीएम केंद्रात 50 हजार रुपयांची रक्कम कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीने सर्व केंद्राचे लेखापरीक्षण केले होते. त्यादरम्यान काहीतरी फेरफार झाल्याचे कंपनीच्या लक्षात आले.

याविषयी कंपनीने सखोल चौकशी केली असता एका मार्गावर एक कोटी 63 लाख तर दुसऱ्या मार्गावर एक कोटी 39 लाख अशी तीन कोटी दोन लाख रुपये रक्कम एटीएम मध्ये भरले नसल्याचे आढळून आले मात्र संबंधित एटीएम ला खोट्या नोंदी करून कॅश बॅलन्सिंग रिपोर्ट मध्ये रक्कम दाखवत आरोपींनी अफरातफर केल्याचे व ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे व कंपनीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!