एन एम एम एस परीक्षेत श्री छत्रपती शाहू हायस्कूल चे घवघवीत यश
एकूण पाच विद्यार्थी पात्र झाले आहेत
एन एम एम एस परीक्षेत श्री छत्रपती शाहू हायस्कूल चे घवघवीत यश
एकूण पाच विद्यार्थी पात्र झाले आहेत
बारामती वार्तापत्र
रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती येथील सन 2020 2021 मध्ये आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता आठवी मध्ये घेण्यात आलेल्या एन एम एम एस परीक्षेत एकूण पाच विद्यार्थी पात्र झाले आहेत या पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी 10000/- रूपये अशी स्कॉलरशिप असून सलग चार वर्ष त्यांना ही स्कॉलरशिप मिळणार आहे.
एन एम एम एस परीक्षेत पात्र असलेले विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे कु. काजल कदम, चि.श्रीराज माने ,चि.राहुल वाघमोडे, चि.ओंकार माने व चि.वैभव गवळी हे असून त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक एन एम एम एस विभाग प्रमुख श्री शंकर माने ,सौ.तृप्ती कांबळे, श्री चंद्रकांत देवकाते, श्री दयानंद राजगुडे व सुनील म्हस्के हे होते.
शाहू हायस्कूलचे प्राचार्य मा. श्री बी एन पवार सर यांच्या हस्ते या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पर्यवेक्षक मा. श्री ए.एस.साळुंके सर शिक्षक प्रतिनिधी श्री जी आर तावरे सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचे जनरल बॉडी सदस्य व स्कूल कमिटी अध्यक्ष माननीय श्री सदाशिव बापूजी सातव यांनीही मनपूर्वक अभिनंदन केले.
शाहू हायस्कूलमधील विद्यार्थी पालक शिक्षक बंधु भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांनीही एन एम एम एस परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.