एप्रिल ते जूनचे वीज बिल गेल्या वर्षीइतकेच भरा, राज्य सरकारचा निर्णय
लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष वीज मीटर रिडिंग न घेता अंदाजे काढण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
एप्रिल ते जूनचे वीज बिल गेल्या वर्षीइतकेच भरा, राज्य सरकारचा निर्णय.
एप्रिल ते जूनचे वीज बिल गेल्या वर्षीइतकेच भरा, राज्य सरकारचा निर्णय
अंदाजे काढण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांमुळे नागरिक हैराण झाले (Maharashtra Government Relief Customer Lockdown Electricity bill) आहेत.
Electricity bill | एप्रिल ते जूनचे वीज बिल गेल्या वर्षीइतकेच भरा, राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष वीज मीटर रिडिंग न घेता अंदाजे काढण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक प्रस्ताव तयार केला आहे. यानुसार युनिट वापरानुसार राज्य सरकार ग्राहकांना दिलासा देणार आहे. (Maharashtra Government Relief Customer Lockdown Electricity bill)
या प्रस्तावानुसार राज्यातील सर्वच वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील वीज वापर आणि गेल्यावर्षी म्हणजे 2019 मध्ये केलेल्या वीज वापराची तुलना केली जाणार आहे. 2019 मध्ये ग्राहकांनी जेवढ्या विजेचा वापर केला असेल तेवढेच वीज बिल या वर्षीच्या एप्रिल, मे, जून महिन्यात ग्राहकांना भरायला लागणार आहे. त्यावरील वीज वापराचा भार हा राज्य सरकार उचलणार आहे. (उदा. जर गेल्यावर्षी तुम्हाला 500 रुपये वीज बिल आले असेल आणि यंदा लॉकडाऊन काळात जर 2000 रुपये विजेचे बिल आले असेल, तर तुम्हाला फक्त 500 रुपये भरावे