एमआयडीसी ने ऑनलाईन पेमेंट ट्रांजेक्शन चार्जेस घेणे बंद करावे – धनंजय जामदार
रक्कम रु. दहा हजार पर्यंत असल्यास ती रोख स्वरूपात भरण्याची सुविधा देणे

एमआयडीसी ने ऑनलाईन पेमेंट ट्रांजेक्शन चार्जेस घेणे बंद करावे – धनंजय जामदार
रक्कम रु. दहा हजार पर्यंत असल्यास ती रोख स्वरूपात भरण्याची सुविधा देणे
बारामती वार्तापत्र
केंद्र व राज्य शासन डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत डिजिटल व ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी विविध माध्यमातून नागरिकांना प्रोत्साहन देत आहे.
महावितरण सारख्या सेवा पुरवठादार सरकारी संस्थांनी या प्रणालीचा स्वीकार करून प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. अशाप्रकारे सर्व शासकीय विभाग डिजिटल पेमेंट प्रणालीला प्रोत्साहन देत आहेत.
परंतु विरोधाभास म्हणजे एमआयडीसी मात्र डिजिटल ऑनलाइन पेमेंट करताना उद्योजक भुरवंडधारकांकडून शुल्क आकारत आहे. हे अन्यायकारक शुल्क त्वरित रद्द करावे अशी मागणी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केली आहे.
एमआयडीसीने हे अन्यकारक शुल्क रद्द करावे याबाबतचे निवेदन बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या शिष्यमंडळाने कार्यकारी अभियंता विजय पेटकर यांना दिले.
या प्रसंगी अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य मनोज पोतेकर ,महादेव गायकवाड ,संभाजी माने, हरीश कुंभारकर, खंडोजी गायकवाड एमआयडीसीचे अधिकारी रामचंद्र माने आदी मान्यवर उपस्थित होते.
धनंजय जामदार म्हणाले एमआयडीसीने हे अन्यायकारक ट्रांजेक्शन शुल्क रद्द करून प्रॉन्ट पेमेंट करणाऱ्या उद्योजकांना रोखीत सूट देणे, चेकद्वारे पेमेंट स्वीकारणे , देयकाची रक्कम रु. दहा हजार पर्यंत असल्यास ती रोख स्वरूपात भरण्याची सुविधा देणे अशा मागण्या बिडा असोसिएशनच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
या मागण्या मान्य करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असून त्या मान्य झाल्यानंतर राज्यातील हजारो भूरवंडधारक उद्योजकांना याचा लाभ होणार असल्याचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी यावेळी सांगितले.
BIDA ने शुल्क रद्द करण्याची मागणी ही योग्य आहे परंतु धोरणात्मक बाब असलेने सदर निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे पुढील कार्यवाही साठी पाठवण्यात येईल असे कार्यकारी अभियंता विजय पेटकर यांनी सांगितले.