एमआयडीसी मधील रेड बर्ड एविएशन संस्थेच्या विरोधात आंदोलन.
सेवा कर न भरता,ना हरकत प्रमाण पत्र न घेता बांधकाम उभारले.
एमआयडीसी मधील रेड बर्ड एविएशन संस्थेच्या विरोधात आंदोलन.
सेवा कर न भरता,ना हरकत प्रमाण पत्र न घेता बांधकाम उभारले.
बारामती: वार्ताहर
बारामती एमआयडीसी परिसरातील रेड बर्ड एविएशन च्या विरोधात बेकायदेशीर बांधकाम व सेवा कर एमआयडीसी कडे न भरणे बाबत निवेदन मिळाले असून अधिक माहिती घेऊन वरिष्ठ अधिकारी यांच्या बरोबर चर्चा करून विमान उड्डान व प्रशिक्षण साठी परवानगी देण्याचा निर्णय घेऊ अशी माहिती केंद्र सरकारचे विमान उड्डाण मंत्रालय चे प्रशिक्षण विभाग चे उपसंचालक अनिल गिल यांनी सांगितले.
रेड बर्ड एव्हीएशन चे शासकीय इंस्पेक्शन करण्यासाठी दिल्ली येथून कॅप्टन अनिल गिल व इतर अधिकारी आले होते. या वेळी त्यांनी आंदोलन कर्त्याना आश्वासन दिले.
बारामती एमआयडीसी मधील रेड बर्ड एविएशन या विमान प्रशिक्षण संस्थेने बारामती एमआयडीसी कडे कोट्यावधी चा सेवा कर भरला नाही,ना हरकत प्रमाणपत्र घेतले नाही तरी बांधकाम उभा केले या विषयी एमआयडीसी कार्यालयाने सदर संस्था ला दोन वेळा नोटीस दिली त्याकडे दुर्लक्ष करून सदर संस्था नि प्रशिक्षण देण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करून बांधकाम पूर्ण केले आहे.
या कडे लक्ष वेधण्यासाठी व शासनाचा महसूल बुडत आहे तरीही बेकायदेशीर संस्था उभी राहत आहे या साठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने आंदोलन करून अनिल गिल यांच्या कडे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी माजी संचालक फ्लाईंग ट्रेनिंग चे कॅप्टन अरुण मान , संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक करण मान,व्यवस्थापक सेवीयर विनसेट व सुनील शिंदे पुणे जिल्हा सचिव संजय वाघमारे तालुका सरचिटणीस रत्नप्रभा साबळे पुणे जिल्हा महिला आघाडी कार्याध्यक्ष रोहित सोनवणे उपाध्यक्ष शहर निलेश जाधव शहर संपर्क प्रमुख उमेश शिंदे विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पुनम घाडगे महिला शहराध्यक्ष रजनी साळवे शहर सरचिटणीस,पत्रकार उमेश दुबे पुष्पराज मोरे ,धनंजय शिंदे आदी मान्यवर उपस्तीत होते.
विमान उड्डाण मंत्रालय चे माजी संचालक कॅप्टन अरुण मान यांचे सुपुत्र करण मान हे संस्थेचे मालक म्हणून काम पाहत आहेत सदर संस्थाने
बारामती एअरपोर्ट लिमिटेड यांचा सेवा कर एमआयडीसी कडे भरलेला नाही हे माहित असताना सुद्धा आपल्या डीजीसीए (D.G.C.A) मध्ये असलेल्या ताकदीच्या जीवावरती संस्थेचे नियमबाह्य काम पूर्ण करून पहात आहेत असा आरोप वेळी आंदोलन कर्त्यांनी केला आहे.
“बारामती एअरपोर्ट ला सेवा कर भरा म्हणून तिसरी नोटीस आज मंगळवार दी 7 जून रोजी दिली आहे नियमानुसार सेवा कर न भरल्यास फोजदारी खटला दाखल करणार” असल्याचे बारामती एमआयडीसी चे कार्यकारी अभियंता एस आर जोशी यांनी सांगितले.
माहिती घेऊन परवानगी देने अथवा न देणे या बाबत निर्णय घेऊ:अनिल गिल संस्थेने बेकायदेशीर रित्या बांधकाम केले,सेवा कर भरला नाही,ना हरकत पत्र प्रमाणपत्र घेतले नाही या बाबत अधिक माहिती घेऊ व दिल्ली येथील वरिष्ठ अधिकारी यांच्या बरोबर चर्चा करू त्यानंतर विमान प्रशिक्षण ला परवानगी देने अथवा न देणे या बाबत निर्णय घेऊ अशी माहिती विमान उड्डाण मंत्रालय प्रशिक्षण चे संचालक अनिल गिल यांनी सांगितले.