महाराष्ट्र

एसटीची नाथजल शुद्धपेयजल योजना कार्यान्वित.मंत्री,ॲड. अनिल परब यांच्या हस्ते लोकार्पण..!

टप्याटप्याने राज्यातील सर्व बसस्थानकावर “नाथजल” हे एसटी महामंडळाचे अधिकृत पेयजल उपलब्ध होणार आहे.

एसटीची नाथजल शुद्धपेयजल योजना कार्यान्वित.मंत्री,ॲड. अनिल परब यांच्या हस्ते लोकार्पण..!

टप्याटप्याने राज्यातील सर्व बसस्थानकावर “नाथजल” हे एसटी महामंडळाचे अधिकृत पेयजल उपलब्ध होणार आहे.

मुंबई; बारामती वार्तापत्र 

एसटीच्या लाखो प्रवाशांना स्वस्त दरात, दर्जेदार शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने “नाथजल” ही शुद्ध पेयजल योजनेचे लोकार्पण मा.परिवहन मंत्री व एस.टी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले.

YouTube player

ते पुढे म्हणले की, या योजनेअंतर्गत महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर महामंडळाचे अधिकृत बाटली बंद पेयजल उपलब्ध करून देण्यात येत आहे त्याचे नामकरण “नाथजल” असे करण्यात आले आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची महान परंपरा लाभली आहे त्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गुरूला ‘नाथ’ या नावाने संबोधले जाते त्यांच्या आदर प्रित्यर्थ एसटीच्या अधिकृत बाटलीबंद पेयजलास “नाथजल” हे नाव देण्यात आले आहे.
संपूर्ण राज्यात बाटलीबंद पाणी पुरविण्यासाठी मे.शेळके बेव्हरजेस प्रा.लि. पुणे (Oxycool) या संस्थेची निवड करण्यात आली असून, सर्व बस स्थानकावर 650 मिलीमीटर व 1 लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये हे “नाथजल” विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यांचा दर अनुक्रमे 10 रुपये व 15 रुपये इतका असणार आहे. अशी माहिती एस.टी. महामंडळाकडून देण्यात आली आहे.
टप्याटप्याने राज्यातील सर्व बसस्थानकावर “नाथजल” हे एसटी महामंडळाचे अधिकृत पेयजल उपलब्ध होणार आहे. अर्थात, त्यामुळे बसस्थानकावर कोणत्याही इतर कंपन्यांचे पेयजल विकण्यास बंदी असेल. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरामध्ये दर्जेदार शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याची हमी एसटी महामंडळाने उचलली आहे. असे प्रतिपादन मंत्री ॲड. अनिल परब यांनी केले आहे.या कार्यक्रमाला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी)श्री. अविनाश ढाकणे, मे.शेळके बेव्हरजेस प्रा.लि. पुणे (Oxycool) या संस्थेचे अध्यक्ष
श्री. निलेश शेळके व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.जनसंपर्क अधिकारी एसटी महामंडळ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!