ऐन दिवाळीत बारामतीकरांना नगरपरिषदेचा दणका, प्लॅस्टिक वापरण्यावर होणार कारवाई -मुख्याधिकारी महेश रोकडे!
प्लास्टिक बंदी असतानाही नागरिकांकडून सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे.
ऐन दिवाळीत बारामतीकरांना नगरपरिषदेचा दणका, प्लॅस्टिक वापरण्यावर होणार कारवाई -मुख्याधिकारी महेश रोकडे!
प्लास्टिक बंदी असतानाही नागरिकांकडून सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे.
बारामती वार्तापत्र
राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाच्या अंमलबजावणीवर अनिष्ट परिणाम होऊ लागल्याने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय बारामती नगरपरिषदेने घेतला आहे.
केंद्र शासनाच्या पर्यावरण व हवामानबदल मंत्रालयाने प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रुल्स २०१६ लागू केले आहेत. त्यानुसार प्लास्टिक वापरास
बंदी घालण्यात आली आहे. तसेच राज्यात महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक अधिसूचना २०१८ लागू करण्यात आली आहे, परंतु त्यानंतरही प्लास्टिकचा वापर थांबलेला नाही. बारामतीत राज्य शासनाचे माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे, त्यावर यामुळे अनिष्ट परिणाम होत आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदूषणास आळा बसावा यासाठी पालिकेने आता प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लास्टिक अविघटनशील असल्याने त्याच्या कचऱ्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत, त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक साधनांचा वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे. प्लास्टिकचा वापर आढळून आल्यास दंडात्मक कारवाईला संबंधिताला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.