ऑनलाईन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी ‘सायबर दोस्त’; केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल.
ग्राहकांनी बँकेच्या कामासाठी दोन ई-मेल अकाऊंट्स वापरण्याचा सल्ला सायबर दोस्तनं दिला आहे.
ऑनलाईन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी ‘सायबर दोस्त’; केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल.
ग्राहकांनी बँकेच्या कामासाठी दोन ई-मेल अकाऊंट्स वापरण्याचा सल्ला सायबर दोस्तनं दिला आहे.
मुंबई: बँक खातेधारकांच्या फसवणुकीचं, ऑनलाईन गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्याचा फटका अनेकांना बसतो. ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वाची नियमावली आणली आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वत:च्या बँक खात्याचं संरक्षण करता येईल. केंद्रीय गृह मंत्रालयानं सायबर सुरक्षा आणि जागरूकतेसाठी ‘सायबर दोस्त’ नावाच्या ट्विटर हँडलवरून ग्राहकांना विविध सूचना देण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांनी बँकेच्या कामासाठी दोन ई-मेल अकाऊंट्स वापरण्याचा सल्ला सायबर दोस्तनं दिला आहे. ग्राहकांनी एका ई-मेल खात्याचा वापर संवाद साधण्यासाठी, तर दुसऱ्या खात्याचा वापर व्यवहारांसाठी करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.