ऑलम्पिकमध्ये नीरज चोप्राची ‘सुवर्ण’ कामगिरी;निमगावकरांनी पेढे वाटून केला जल्लोष
नीरज चोप्राच्या गगनचुंबी भाल्याने घेतला सुवर्णवेद

ऑलम्पिकमध्ये नीरज चोप्राची ‘सुवर्ण’ कामगिरी;निमगावकरांनी पेढे वाटून केला जल्लोष
नीरज चोप्राच्या गगनचुंबी भाल्याने घेतला सुवर्णवेद
इंदापूर : प्रतिनिधी
टोकियो ऑलम्पिक मध्ये शनिवारी ( दि.७ ) भालाफेक या क्रीडा प्रकारात गगनचुंबी भाला फेकत नीरज चोप्राने सुवर्ण वेध घेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.तसेच भारताचा पैलवान बजरंग पुनियाने कुस्तीच्या फ्रीस्टाईल ६५ किलो वजनी गटात काझकिस्तानच्या दौलत नियाजबेकोवला ८-० ने धूळ चारत कांस्यपदक मिळवल्याने इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील ग्रामस्थांनी पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला.
उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानमध्ये आयोजित टोकियो ऑलम्पिकमध्ये भारताचे सुवर्णपदकाचे स्वप्न भालाफेकपटू नीरज चोप्राने पूर्णत्वास नेले.त्याचा आनंद संपूर्ण भारतवासीयांना गगनात मावेनासा झाला आहे.पहिल्या सुवर्ण पदकाच्या आशेने टिव्ही समोर बसलेल्या १३० कोटी भारतीयांना अखेर सुवर्ण वेध घेताना नीरज चोप्रा पहावयास मिळाला.
निमगाव केतकी येथील ग्रामस्थांनी शनिवारी ( दि.७ ) ‘नीरज’च्या विजयाने एकच जल्लोष करत ग्रामस्थांमध्ये सर्वत्र पेढे वाटप केले.ऑलम्पिक मधील विजेत्यांचे कौतुक करत आनंद साजरा केला.