ओबीसीच्या आरक्षण लढ्यासाठी बारामती मधून एल्गार..
ओबीसी समाजातील अनेक मान्यवर, नेते सामाजिक कार्यकर्ते, आणि अभ्यासक उपस्थित होते.

ओबीसीच्या आरक्षण लढ्यासाठी बारामती मधून एल्गार..
ओबीसी समाजातील अनेक मान्यवर, नेते सामाजिक कार्यकर्ते, आणि अभ्यासक उपस्थित होते.
बारामती वार्तापत्र
ओबीसीचे अतिरिक्त आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरविल्यानंतर देशात आणि राज्यात ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. हक्काचं राजकीय आरक्षण गेल्यामुळे ओबीसी मध्ये येणाऱ्या सर्व जाती धर्मातून प्रचंड चीड निर्माण होत आहे. याचं पार्श्वभूमीवर राज्यात एल्गार महामोर्चा चे आयोजन करण्यात येण्यार आहे. याची तयारी करण्यासाठी ओबीसीचे अनेक नेते,सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक यांची बारामती तालुक्यातील लोणीभापकर येथील गंगोत्री लॉन येथे बैठक पार पडली.
या बैठकीत ओबीसीच्या अनेक मागण्या आणि त्यावर पाठपुरावा कसा करावा एल्गार महामोर्चा चे नियोजन कसे करावे याबाबत नियोजन करण्यात आले. यावेळी हे ओबीसी एल्गार महामोर्चा हा राजकीय पक्ष विरहीत असावा यावर एकमत करून तशा पद्धतीने पुढची दिशा ठरवण्यात आली आहे. यावेळी ओबीसी समाजातील अनेक मान्यवर, नेते सामाजिक कार्यकर्ते, आणि अभ्यासक उपस्थित होते.