
भगवान महावीर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
51 रक्तदात्यांनी उत्सफूर्तपणे रक्तदान केले .
बारामती वार्तापत्र
श्री. भगवान महावीर यांच्या जन्माकल्यानक निमित्त भारतीय जैन संघटना बारामती यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी 51 रक्तदात्यांनी उत्सफूर्तपणे रक्तदान केले .
रक्तदान शिबिराचे उद्घाटन सकल जैन पंच बारामतीचे अध्यक्ष किशोर शहा यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी माजी नगराध्यक्षा भारती मुथा, ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स पंचम झोनचे उपाध्यक्ष दिलीप धोका, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष विजय मंडलेचा, उपाध्यक्ष वैशाली मुथा खजिनदार विपुल वडूजकर, भारतीय जैन संघटनेचे माजी अध्यक्ष आनंद छाजेड, हर्शल सुराणा, प्रफुल मुथा, सौ अल्पा भंडारी.सौ. कविता मंडलेचा, ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.के.सिसोदिया, आदी मान्यवर उपस्थित होते .
भगवान महावीर यांचे शिकवणीतील दान करणे ही मुख्य शिकवण असुन सर्वश्रेष्ठ दान रक्तदान म्हणूनच भारतीय जैन संघटना दरवर्षी जन्मकल्यानक या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते असे भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष विजय मंडलेचा यांनी सांगितले .
तर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी स्वप्नील पहाडे, राहुल शहा, अजित बेदमुथा, रक्त संकलन इंडियन रेड क्रॉस ब्लड बँक बारामती यांनी केले .