ओबीसी आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच भाष्य…काय म्हणाले पहा
पन्नास वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांनी केले तेच काम पुढे नेटाने घेऊन जाण्याकरिता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी करत आहे.

ओबीसी आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच भाष्य…काय म्हणाले पहा.
पन्नास वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांनी केले तेच काम पुढे नेटाने घेऊन जाण्याकरिता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी करत आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती- सध्या राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.ओबीसी आरक्षणाचा तिडा सुटल्याशिवाय आगामी निवडणुका घेऊ नये, अशी भूमिका राज्य सरकारसह सर्वच पक्षांनी मांडली आहे. ओबीसी आरक्षण संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आम्ही मिळून सामोपचाराने मार्ग काढण्याचा प्रयत्न करू त्यामुळे तिळमात्र शंका बाळगू नका. कोणत्याही घटकावर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, बहुजन, भटका वा ओबीसी अशा कोणत्याही समाज घटकावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. तालुक्यातील कटफळ या गावात ग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय व भारतीय सर्वेक्षण विभाग, डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यात गावठाण भूमापन ड्रोन सर्वेक्षण कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की, कोणत्याही समाज घटकावर अन्याय होऊ न देता सर्वच समाजाला पुढे घेऊन जाण्याचे जे गेल्या पन्नास वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांनी केले तेच काम पुढे नेटाने घेऊन जाण्याकरिता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी करत आहे. असे त्यांनी सांगितले.