ओ’ शेठ तुम्ही आमच्याकडे येणार का थेट..?राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व शहा कुटुंबात तब्बल एक तास चर्चा; शहा बंधूंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे खुले निमंत्रण-सूत्र
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग

‘ओ’ शेठ तुम्ही आमच्याकडे येणार का थेट..?राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व शहा कुटुंबात तब्बल एक तास चर्चा; शहा बंधूंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे खुले निमंत्रण-सूत्र
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग
इंदापूर : प्रतिनिधी
राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी ( दि.२०) इंदापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक,नगरसेवक भरत शहा व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली.सदरच्या भेटचा पूर्ण तपशील समजला नसला तरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहा बंधूंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती आहे.
इंदापूरच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपले मजबूत स्थान असणारे भरत शहा यांनी घरगुती कारण सांगत काही दिवसांपूर्वी आपणाकडे असणाऱ्या विविध पदांचा राजीनामा देखील दिला होता.त्यामुळे अगोदरच तालुक्यातील सध्याच्या होत असलेल्या वेगवान घडामोडी पहाता अनपेक्षित गाठीभेटिंमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी काळात इंदापूर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.तसेच सहकारी साखर कारखान्याच्या देखील निवडणुका होणार आहेत.यामुळे प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये इन्कमिंग – औउटगोईंग पहावयास मिळणार का ? कोण ‘जायंट किलर’ ठरणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.