महाराष्ट्र

कंगना रनौतला मुंबईहून मनालीला गेल्यानंतर १० दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा ही आपल्या वादग्रस्त वक्त्व्यांनंतर ५ दिवस मुंबईत राहिली.

कंगना रनौतला मुंबईहून मनालीला गेल्यानंतर १० दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा ही आपल्या वादग्रस्त वक्त्व्यांनंतर ५ दिवस मुंबईत राहिली.

मुंबई मध्ये राहून तीने अनेकांवर निशाणा देखील साधला. परंतु त्यानंतर मुंबईतून हिमाचल प्रदेशमधील मनालीला आपल्या घरी गेली आहे. मात्र, तेथे गेल्यानंतर तिला १० दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे.कंटेनमेंट झोन असलेल्या मंबईतून आल्याने हिमाचल प्रदेश आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून कंगनाला क्वारंटाईन केलं आहे. त्यामुळे आता कंगनाला पुढील १० दिवस कोठेही बाहेर जाता येणार नाही. तसेच कुणाला भेटताही येणार नाही. कोरोनाच्या या संकटामुळे अता कंगणाला देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबई मध्ये येत असताना तीची कोरोना टेस्ट झाली होती आणि तीचा कोरोना अहवाल देखील नेगेटिव्ह आला होता परंतु ती पुन्हा तीच्या गावी हिमाचल प्रदेश ला परतली आहे.क्वारंटाईन काळातच कंगना रनौतची आठवडाभरानंतर पुन्हा एकदा कोव्हिड १९ चाचणी घेतली जाणार आहे. त्या चाचणीच्या अहवालावरच कंगनावरील निर्बंध शिथिल होणार की आणखी वाढणार हे ठरणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अद्यापही राज्य प्रवेश करण्यासाठी ई-पास सक्ती कायम आहे. महाराष्ट्रात अनलॉक दरम्यान टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल होत आहेत. दरम्यान, मुंबईहून मनालीला जाताना कंगनाने एक ट्वीट करत आपण जड अंतःकरणाने जात असल्याचं म्हटलं. ती म्हणाली, “मी खूप जड अंतकरणाने मुंबई सोडत आहे. या काही दिवसांमध्ये मला घाबरवण्याचा प्रयत्न केला गेला. माझं ऑफिस तोडल्यानंतर माझं घर तोडण्याचा प्रयत्न होत आहे. सशस्त्र सुरक्षा माझ्याभोवती होती, त्यामुळे मी पीओके असं म्हणणं खरंच ठरलं आहे”, असं ट्वीट कंगनाने केलं. आणि अस म्हणत ती गेली..

Related Articles

Back to top button