कटफळ च्या श्री.जानाई देवीची यात्रा २० ऑक्टोबर रोजी होणार
२१ तारखेला पहाटे पेडगावच्या काटकरांचा भाकनुकीचा कार्यक्रम होणार आहे.
कटफळ च्या श्री.जानाई देवीची यात्रा २० ऑक्टोबर रोजी होणार
२१ तारखेला पहाटे पेडगावच्या काटकरांचा भाकनुकीचा कार्यक्रम होणार आहे.
बारामती: वार्तापत्र
कटफळ येथील श्री. जानाई देवीच्या १६ तारखेला यात्रेला घटस्थापना करून सुरुवात होणार आहे. त्यानंतर बुधवार २० तारखेला यात्रेचा मुख्य दिवस असून त्या दिवशी गावातील सर्व समाजाच्या, देवीच्या आरत्यांचा कार्यक्रमास असतो. व संध्याकाळी पंचक्रोशीतील शेटफळ, शिर्सुफळ, पारवडी, गोजुबावी, शिरवली, पेडगाव, तांदूळवाडी, उंडवडी इत्यादी गावांच्या छबीन्यांचा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. व त्याच रात्री १ वाजता शेटफळचे मानाचे काटकर उभा राहणार आहेत.
व २१ तारखेला पहाटे पेडगावच्या काटकरांचा भाकनुकीचा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती ग्रामपंचायत , जानाई देवी ट्रस्ट व यात्रा कमिटी यांच्या वतीने देण्यात आली आहे. व रस्ते, लाईट, पाणी, आरोग्य याची सर्व तयारी ग्रामपंचायती मार्फत करण्यात आलेली आहे. व कोरोनाच्या परिस्थितीमुळे गर्दी न करता धार्मिक कार्यक्रम केले जाणार आहेत. व शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन यात्रा पार पाडली जाणार असल्याची माहिती सरपंच सौ. पुनम किरण कांबळे यांनी दिली.