स्थानिक

कण्हेरीत सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांचा शिवराज्याभिषेक दिनी सन्मान सोहळा..

इतिहासाला उजाळा दिला पाहिजे.

कण्हेरीत सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांचा शिवराज्याभिषेक दिनी सन्मान सोहळा..

इतिहासाला उजाळा दिला पाहिजे.

बारामती वार्तापत्र

सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांनी हातात तलवार घेतली नसती तर आज आपल्याला सोन्याचे दिवस बघायला मिळाले नसते… इतिहासकार संतोष पिंगळे

बारामती : बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र कण्हेरी याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन आणि छत्रपतीच्या 22 प्रमुख निवडक सरदारापैकी प्रराक्रमी सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांच्या समाधीस्थळी सन्मान दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी निरावागज, कण्हेरी, सोनगाव, मेखळी, पिंपळी, भिगवण, मदनवाडी आणि पंचक्रोशीतील अनेक सर्वपक्षीय पदाधिकारी, देवकाते परिवारातील प्रमुख मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली यामध्ये प्रमुख मान्यवर म्हणून होळकर घराण्यांचे वंशज भूषणसिहराजे होळकर, सुभानजी देवकातेचा ज्यांनी इतिहास शोधून काढला ते इतिहासकार सुमित लोखंडे, संतोष पिंगळे, दिलीप माने, कोकाटे महाराज, शिवव्याख्याते महेश जाधव, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळेस श्रीक्षेत्र कन्हेरी याठिकाणी सकाळी अंकुश देवकाते व मोनाली देवकाते या दाम्पंत्याच्या हस्ते अभिषेक करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या सन्मान सोहळ्याचे आयोजन सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते स्मारक समितीच्या माध्यमातून ॲड.गोविंद देवकाते, वसंतराव देवकाते,अंकुश देवकाते, भारत देवकाते, प्रकाश देवकाते यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रस्तावित आणि आभार ॲड.गोविंद देवकाते मानले.

यावेळी भूषणसिह होळकर म्हणाले की, इतिहासाचा विषय निघतो, बोलतो त्यावेळी त्यात राजकारण आणू नका. ऐतिहासिक विकासाचे राजकारण करण्यासाठी महापुरुषांचा उपयोग नक्की करा पण ऐतिहासिक महापुरुषांचा वापर राजकारणासाठी करू नका असं वक्तव्य होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी व्यक्त केले आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी कण्हेरीत होणाऱ्या शिवसृष्टीमध्ये देवकाते सरदार यांचे स्मारक व्हावे अशी मागणी करणार असल्याची भूमिका मांडली.

मराठी इतिहास संशोधक संतोष पिंगळे म्हणाले की, तुमची तलवार आणि तलवार पकडणारी मूठ जेवढी मजबूत असते तेवढीच राजकारणामध्ये पकड मजबूत असावी लागते. बारामती तालुक्यातील सुपे परगण्यातील 22 गावांची सरपाटीलकी सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांच्याकडे होती.

आजच्या काळात तलवारी आणि घोडे घेऊन आपण फिरू शकत नाही यामुळे आजच्या घडीला इतिहास सांगायचा कशासाठी तर इथून पुढच्या काळात आपल्या पूर्वजांनी केलेली कर्तबगारी आणि त्या कर्तबगारीतून आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे यासाठी आपण इतिहासाला उजाळा दिला पाहिजे.

आज पश्चिम महाराष्ट्रातील सदन भाग हा कोणामुळे झाला असेल तर फक्त आणि फक्त सरदार सुभानजी बळवंतराव देवकाते या योद्यामुळे झाला आहे. या योध्याने हातात तलवार घेतली नसती तर आज आपल्याला सोन्याचे दिवस बघायला मिळाले नसते. आजच्या काळात ज्या काही जमीन-जुमला मालमत्ता वाटणीला आल्या आहेत त्या केवळ आणि केवळ सरदार सुभानजी देवकाते यांच्यामुळेच मिळाल्या आहेत.

त्यांनी तलवारीच्या अनुमाने शरीर खर्चीले. जशी तलवार आमच्या बापजाद्यांनी जीजवली तसा देह देखील जीजवला आणि जहागिरी आणि इनाम वतन मिळवली त्यामुळे आपण सर्वांनी या पूर्वजा प्रति कृतज्ञ राहिले पाहिजे. आपलं भाग्य आहे की असा पराक्रमी योद्धा सुभेदार सुभानजी बळवंत देवकाते यांची समाधी आपल्या बारामती तालुक्यातील कण्हेरी गावात आहे.

त्यामुळे आपल्या पूर्वजांनी केलेल्या कार्याचा उजाळा देण्यासाठी आजचा सन्मान सोहळा निश्चित आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असेच कार्यक्रम जर वर्षी घ्यावेत अशी अपेक्षा इतिहासकार संतोष पिंगळे यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!