दौंड

कत्तलीपासून वाचविलेली ६३ वासरे जगविण्यासाठी मदतीची गरज ! बोरमलनाथ गोशाळेकडून मदतीचे आवाहन!

कसायांच्या गल्लीत घुसून धाडसाने६३वासरांचे प्राण वाचविणाऱ्या पोलिसांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच

कत्तलीपासून वाचविलेली ६३ वासरे जगविण्यासाठी मदतीची गरज ! बोरमलनाथ गोशाळेकडून मदतीचे आवाहन!

कसायांच्या गल्लीत घुसून धाडसाने६३वासरांचे प्राण वाचविणाऱ्या पोलिसांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच…

बारामती वार्तापत्र

मिलिंद एकबोटे अखिल भारत कृषी गोसेवा संघ महाराष्ट्र राज्य

यवत वार्ताहर – दिं.२१.११.२०२० रोजी इंदापुर कसाई मोहल्ल्यात पोलिसांनी कडक कारवाई करुन ६३ वासरे वाचविली आणि मोठ्याप्रमाणात गोमांस जप्त केले. मानद पशुकल्यानं अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. ही सर्व वासरे दौंड तालुक्यातील केडगाव येथील बोरमलनाथ गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. गोशाळा चालक कैलास उर्फ आबा शेलार यांचे मन मोठे म्हणून त्यांनी कत्तलीपासून वाचविलेली आणि आईच्या दुधाला पारखी झालेली वासरे सांभाळण्याची जोखीम स्वीकारली. गोशाळेचीआर्थिक परिस्थिती समाधानकारक नाही. तरीसुद्धा शिवशंकर स्वामी यांच्या हाकेला ओ देणे हे आपले कर्तव्य असे मानणाऱ्या आबांनी ही कठीण जबाबदारी पार पडण्याचे ठरविले आहे. ही वासरे भुकेने तडफडत असल्याने खूप आरडा ओरडा करत होती. तेव्हा अंबानी पहाटे आपल्या मित्रांकडून पैसे उसने घेऊन दूध विकत घेतले आणि गोशाळेतील सेवकांनी तसेच गोरक्षकांनी बाटलीने दूध पाजून सर्व ६३ वासरांची भूक शांत केली. ही दूध पीती वासर मरणाच्या दारेतून पोलिसांनी सोडविली. परंतु त्यांना जगवणे खूप खर्चिक ठरणार आहे. आईच्या दुधाची गरज असलेल्या या वासरांना कोणत्या तरी मार्गाने दूध उपलब्ध करून द्यावेच लागणार आहे. जेव्हा ही वासरे आईच्या दुधासाठी टाहो फोडतील तेव्हा त्यांची भूक भागविणे ही आबांची जबाबदारी आहे. त्यामुळे या वासरांना दूध पाजण्यासाठी समाजाने गोशाळेला मदत करणे आवश्यक आहे. पुढील तीन महिने दररोज किमान 100 लिटर दुध गोशाळेला लागणार आहे. आपण फुल ना फुलाची पाकळी देऊन गोशाळेला मदत करूया आणि या भुकेला आणि तहानलेल्या वासरांना आधार देऊया !
आपल्या आईची आठवण करणाऱ्या वासराच्या तोंडात दुधाचे चार थेंब टाकणे खुपच गरजेचे आहे. त्यासाठी
सर्वांना मदत करण्याची आणि हे गॊवंश वाचविण्याची कळकळीचे विनंती आम्ही करत आहोत.
Name – Shri Bormalnath Goshala Trust pune
Maharashtra Gramin Bank ( Boripardhi)
lFSC CODE- MAHG0004604
A/c no. 80062988296
Google pay no :- 8380808051या नंबरवर मदत करण्याचे आवाहन केडगाव बोरमलनाथ गोशाळा यांच्याकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!