कनिष्ठ वेतन श्रेणी कामगार संघटनेची एसटी संपातून माघार,बहुसंख्य कर्मचारी अजूनही संपावर ठाम, राज्यातील संपकरी कामगारांच्या भूमिकेकडे लक्ष
आझाद मैदानावरील कर्मचारी अजूनही संपावर ठाम बघायला मिळत आहेत.
कनिष्ठ वेतन श्रेणी कामगार संघटनेची एसटी संपातून माघार,बहुसंख्य कर्मचारी अजूनही संपावर ठाम, राज्यातील संपकरी कामगारांच्या भूमिकेकडे लक्ष
आझाद मैदानावरील कर्मचारी अजूनही संपावर ठाम बघायला मिळत आहेत.
प्रतिनिधी
अजय गुजर प्रणित कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेनं एसटी संपातून माघार घेतली आहे. तर तिकडे आझाद मैदानातील आंदोलक मात्र एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. काल (सोमवारी) परिवहनमंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत अजय गुजर यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे.
अजय गुजर प्रणित संघटनेचा निर्णय मान्य नाही, असं आझाद मैदानातल्या कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. विलिनीकरणाची मागणी मान्य होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याचा निर्धार आझाद मैदानातल्या संपकरी कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळं एसटी संपाचं काय होणार? आझाद मैदानातले कर्मचारी आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल. तरी, एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटानं संप मागे घेतल्यानं लालपरीची सेवा पूर्ववत होण्यास काहीशी मदत नक्कीच होईल.
मंत्री अनिल परब आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ कामगार वेतनश्रेणीचे अजयकुमार गुजर यांच्यात काल झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेत असल्याचं गुजर म्हणाले आहेत. मात्र, आझाद मैदानावरील कर्मचारी अजूनही संपावर ठाम बघायला मिळत आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांकडून अनेक व्हॉट्सॲप ग्रुप बनवण्यात आले आहेत. त्याआधारे आझाद मैदानात घडणाऱ्या घडामोडी आणि निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. सोबतच हा संप संघटनाविरहित असल्याने मागे हटायचं नाही, अशी भूमिका त्यांच्याकडून घेण्यात आली आहे.