कर्ज वसुली थांबवा अन्यथा कारवाई :नारायण शिरगावकर
विविध फायनान्स अधिकारी व पोलीस अधिकारी बैठक संपन्न.
कर्ज वसुली थांबवा अन्यथा कारवाई :नारायण शिरगावकर.
विविध फायनान्स अधिकारी व पोलीस अधिकारी बैठक संपन्न.
बारामती:वार्तापत्र शहरातील विविध फायनान्स अधिकारी व पोलीस अधिकारी यांची कर्ज वसुली साठी बैठक संपन्न झाली या मध्ये वसुली साठी नियमबाह्य तगादा लावल्यास कारवाई करू असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार मार्च ते ऑगस्ट 2020 पर्यंत कर्जवसुलीस स्थगिती आहे. त्यामुळे या काळातील कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपन्यांच्या वसुली अधिका-यांनी दादागिरी केली, तर त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक औदुबंर पाटील यांनी दिला आहे.
बारामती शहर पोलिस ठाण्यात काल विविध फायनान्स कंपन्यांच्या अधिका-यांची बैठक झाली. यात शिरगावकर यांच्यासह पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील हेही उपस्थित होते. लॉकडाउनमुळे अनेकांचे उत्पन्नच थंडावल्याने कर्जाचे हप्ते भरणे अनेकांना शक्य होत नाही. अशा परिस्थितीत काही फायनान्स कंपन्यांच्या वसुली अधिका-यांकडून दमदाटी करून वसुलीचे प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यात बजाज फायनान्सच्या दोन कर्मचा-यांवर पोलिसांनी गुन्हेही दाखल केले.
या बैठकीत रिझर्व्ह बँकेने जे निर्देश दिलेले आहेत, त्यांचे पालन व्हायला हवे, फेब्रुवारी 2020 पर्यंतची कर्जाची बाकी वसूल करताना महिलांशी सौजन्याने वागावे, वसुलीसाठी जाताना ओळखपत्र जवळ गरजेचे आहे, सर्व कायदेशीर बाबींचीही पूर्तता करणे गरजेचे आहे, असे शिरगावकर व पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
वसूली करताना कायद्याचे उल्लंघन करू नये, ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तू फायनान्स कंपनीने जबरदस्तीने हिसकावून नेऊ नयेत, महिलांशी सौजन्याने बोलले पाहिजे, वेळी अवेळी जाऊन लोकांना त्रास देऊ नये, वसूली प्रक्रियेत रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन होता कामा नये, अशा सूचना फायनान्स कंपनीला देण्यात आल्या.
या प्रकरणी राजे ग्रुपचे गणेश कदम, ऍड भार्गव पाटसकर यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांची पोलिसांनी दखल घेत फायनान्स कंपनीच्या अधिका-यांना बैठक घेत इशारा दिला आहे.