क्राईम रिपोर्ट

कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या;हिजाबविरोधी पोस्टमुळे खून झाल्याचा आरोप!

परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून 144 कलम लागू 

कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या;हिजाबविरोधी पोस्टमुळे खून झाल्याचा आरोप!

परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून 144 कलम लागू

क्राईम;बारामती वार्तापत्र

कर्नाटकातील शिवमोगामध्ये 23 वर्षाच्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हर्षा नावाच्या या तरुणाची हत्या झाल्यानंतर शिवमोगा परिसरात मोठा तणाव पसरला आहे. येथे पोलिसांनी कलम 144 लागू केले आहे. हत्या झालेला तरुण बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

उजव्या विचारांच्या अनेक संघटनांनी एकत्र येऊन शाळा आणि कॉलेजात हिजाबवर बंदी आणण्यासाठी मोर्चे आणि आंदोलने केली आहेत. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या हिजाब वादात बजरंग दलाने सक्रीय भूमिका बजावली आहे. हिजाब वादामुळे कर्नाटकात तणावाचं वातावरण असताना एका बजरंग दल कार्यकर्त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

हर्षा असं हत्या झालेल्या 26 वर्षीय कार्यकर्त्याचं नाव आहे. तो कर्नाटकातील शिमोगा परिसरातील रहिवासी होता. रविवारी रात्री नऊच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार चाकुने वार करून त्याची हत्या केली आहे. वार झाल्यानंतर हर्षाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. हिजाबविरोधी पोस्ट केल्याच्या कारणातून हर्षाची हत्या झाल्याचा आरोप काही संघटनांकडून केला जात आहे.

पण ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली? याची कोणीतीही अधिकृत माहिती अद्याप पोलिसांकडून देण्यात आली नाही. ऐन हिजाबचा वाद शिगेला पोहोचला असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानं शिमोगा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मृत हर्षा गेल्या अनेक वर्षांपासून बजरंग दलाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत होता. या हत्येनंतर शिमोगा जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रविवारी सायंकाळी नऊच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांने हर्षावर चाकुने वार केले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या हर्षाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण याठिकाणी त्याची प्राणज्योत मालवली आहे. या प्रकरणी अधिक माहिती येणं अद्याप बाकी आहे. हिजाब पोस्टमुळेच ही हत्या झाली असल्याची कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आली नाही. हत्येच्या नेमक्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी शिमोगा शहरातील सीगेहट्टी परिसरात अनेक वाहनं जाळली आहेत.  आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram