कर्नाटक

कर्नाटक : विधान परिषद उपसभापतींची आत्महत्या; रेल्वे रुळावर सापडला मृतदेह

राजकीय वर्तुळात बसला धक्का

कर्नाटक : विधान परिषद उपसभापतींची आत्महत्या; रेल्वे रुळावर सापडला मृतदेह

राजकीय वर्तुळात बसला धक्का

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

कर्नाटकातील राजकीय वर्तुळाला हादरवून टाकणारी घटना सोमवारी मध्यरात्री समोर आली. कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एसएल धर्मगौडा यांनी आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे रेल्वे रुळावर त्यांच्या मृतदेह आढळून आला. पोलिसांना मृतदेह सापडलेल्या ठिकाणी धर्मगौडा यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोटही सापडली आहे.

जेडीएसचे नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. चिक्कामागलुरू जिल्ह्यातील कादूरजवळील एका रेल्वे रुळावर रात्री दोन वाजता त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे.

धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक असल्याचं माजी पंतप्रधान व जेडीएसचे नेते एचडी देवगौडा यांनी म्हटलं आहे. “विधान परिषदेचे उपसभापती आणि जेडीएसचे नेते एसएल धर्मगौडा यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्का बसला आहे. ते एक शांत आणि सभ्य नेते होते. त्यांच्या जाण्याने राज्याचे नुकसान झालं आहे,” अशा शब्दात देवगौडा यांनी शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram