‘कर्मयोगी’चा पुढील हंगामात १६ लाख टन गाळप करण्याचा संकल्प – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
कारखान्याकडून ३२व्या गळीत हंगामात ११ लाख १२ हजार ५०० मे. टन ऊस गाळप
‘कर्मयोगी’चा पुढील हंगामात १६ लाख टन गाळप करण्याचा संकल्प – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
कारखान्याकडून ३२व्या गळीत हंगामात ११ लाख १२ हजार ५०० मे. टन ऊस गाळप
इंदापूर : प्रतिनिधी
कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या ३२व्या ऊस गळीत हंगामामध्ये यशस्वीरित्या ११ लाख १२ हजार ५०० मे. टन गाळप केल्याबद्दल सर्व कामगार बंधू, ऊस वाहतूकदार यांना स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की,सर्व सभासद शेतकरी, ऊस वाहतूकदार, कामगारांच्या वतीने कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने पुढील हंगामात १६ लाख टन गाळप करण्याचा संकल्प केला आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ सर्वांनी सहकार्य केल्याने विश्वासाने, पारदर्शकपणे आपण ११ लाख टनांपेक्षा जास्त ऊसाचे गाळप केले असून पुढील हंगामामध्ये १६ लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी ही कारखानदारी उभा करून इंदापूर तालुक्याला वैभव मिळवून दिले आहे. आज नीरा भीमा सहकारी साखर कारखाना व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून १८ लाख लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. कर्मयोगी कारखान्याच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या कारखान्याने एकही दिवस क्लिनिंग घेतले नाही. महाराष्ट्राच्या पहिल्या दहा कारखान्यांमध्ये आपला समावेश होण्यासाठी आपणास प्रयत्न करावयाचे आहेत. ‘
कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा यांनी सर्वांचे सहकार्य झाल्याने हे उद्दिष्ट आपण पूर्ण केले असून उद्दिष्ट समोर ठेवून कार्य केल्यास यश संपादन करता येईल असे मत व्यक्त केले. अशोक पवार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. आभार संचालक राहुल जाधव यांनी मानले.