”कर्मयोगी कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतुक करारास उत्स्फुर्त प्रतिसाद”
बैलगाडी व ट्रॅक्टरगाडीच्या कराराचा शुभारंभ...
”कर्मयोगी कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतुक करारास उत्स्फुर्त प्रतिसाद”
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
(दि. 9 जूलै) – कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम 2020-21 ची तयारी जोरदारपणे सुरु केलेली असून ऊस तोडणी वाहतुकीसाठीचे ट्रक -ट्रॅक्टरचे गाळप क्षमतेप्रमाणे आवश्यक असलेले करार पूर्ण झालेले आहेत. बैलगाडी व ट्रॅक्टरगाडीच्या कराराचा शुभारंभ आज सकाळी कारखानास्थळी करणेत आलेची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी हर्षवर्धन पाटील तसेच कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांनी दिली.
कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखान्याने येणा-या गाळप हंगामामध्ये कार्यक्षेञामधील सभासदांच्या उपलब्ध ऊस क्षेञाची व शेतकी विभागाकडे नोंद झालेल्या ऊसक्षेञाची माहिती घेऊन 14 लाख मे.टन गाळपाचे उदिदष्ठ ठरविलेले असून ऊसतोडणी व वाहतुक यंञणा उभारणीचे काम सुरु आहे. त्यानुसार ट्रक व टॅक्टरचे कार्यक्षेञातील 400 व कार्यक्षेञाबाहेरील 150 करार पूर्ण झालेले आहेत. तसेच बैलगाडी 700 व टॅक्टरगाडी 300 करार करणेचे काम सुरु असून त्यास तोडणी मुकादमांचा आज उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालेला आहे.
कर्मयोगी कारखान्याच्या स्थापनेपासून आजतागायत काही ऊस तोडणी मुकादम कर्मयोगीकडेच काम करीत आहेत. आज करार करणेसाठी आवर्जुन उपस्थित राहिल्याबददल सर्व प्रमुख बैलगाडी मुकादमांचा सत्कार कारखान्याचे वतीने करणेत आला.
पुढील येणा-या गाळप हंगामासाठी कारखाना कार्यस्थळावर उपस्थित झालेल्या यंञणेसाठी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण यंञणेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या द़ुष्टीने कारखान्याच्या वतीने संपुर्ण खबरदारी घेणेत येईल असे कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, तसेच मुख्य शेतकी अधिकारी एस.जी.कदम, शेतकी अधिकारी के.एन. हिंगमिरे, वर्क्स मॅनेजर ए.सी. पोरे व सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.