इंदापूर

कर्मयोगी सेंद्रिय खत वापरल्याने ऊस पिकाची जोमदार वाढ

कर्मयोगी शंकरराव पाटील सह.साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुतार यांनी दिली माहिती

कर्मयोगी सेंद्रिय खत वापरल्याने ऊस पिकाची जोमदार वाढ

कर्मयोगी शंकरराव पाटील सह.साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुतार यांनी दिली माहिती

इंदापूर : प्रतिनिधी

कर्मयोगी शंकरराव पाटील सह.साखर कारखाना तयार करीत असलेल्या सेंद्रिय खताचा वापर कार्यक्षेञातील शेतकरी करीत असल्याने ऊसपिक जोमदार बहरले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी दिली. मौजे कालठण नं. २ येथील प्रगतशिल शेतकरी सुदाम चंद्रभान पाडुळे यांनी को.सी. ८६०३२ या ऊस पिकासाठी कर्मयोगी सेंद्रिय खत वापरल्याने यापिकासह पडस्थळ, पिंपरी भागातील प्लॉटची पाहणी याप्रसंगी करण्यात आली.दरम्यान या भागातील बहुतांश शेतकरी रासायनिक खतांचा अत्यल्प वापर करुन सेंद्रिय खतांचा मुबलक प्रमाणात वापर करीत असल्याचे शेतकरी सुदाम पाडुळे यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.

प्लॉटवरती शेतक-यांना माहिती देताना कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील व व्हाईस चेअरमन पद्मा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट अशा सेंद्रिय व जैविक खताचे उत्पादन सुरु असून दिवसेंदिवस यास सभासदांचा प्रतिसाद वाढत आहे. “कर्मयोगी शिवार फेरी” योजनेअंतर्गत कारखान्याने विविध भागातील सभासदांच्या प्रत्यक्ष प्लॉटवर जावुन शेतक-यांच्या अडीअडचणी समजुन घेवून त्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम चालू केलेला आहे. तसेच सभासदांनी मातीपरीक्षण तसेच जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक खते वापरण्याबाबत आवाहन केले. पर्यावरण व्यवस्थापक यांनी जमिनीचा कर्ब व सेंद्रिय खतांचे महत्व या विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी एस.जी.कदम, ऊस विकास अधिकारी गणेश पोळ, पर्यावरण व्यवस्थापक जे.व्ही.माने व कालठण भागातील विलास पाडुळे, सुनिल जगताप, गणेश मेंगडे, राहूल जगताप, वर्षल पाडुळे, हारुन मुलाणी, आदिकराव रेडके, संतोष जगताप हे शेतकरी उपस्थित होते. सर्व उपस्थित ऊस उत्पादक सभासदांनी “कर्मयोगी शिवार फेरीचे” आभार व्यक्त केले व ही बाब कौतुकास्पद असलेचे नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram