कऱ्हा नदीला पूर; नदीकाठच्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत
बारामती नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आला सतर्कतेचा इशारा
कऱ्हा नदीला पूर; नदीकाठच्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत
बारामती नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आला सतर्कतेचा इशारा
बारामती वार्तापत्र
बारामती : मुसळधार पावसामुळे पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणातून रात्री उशीरा चार हजार क्यूसेक्सने पाणी सोडल्यामुळे बारामतीत क-हा नदीला मोठा पूर आला आहे. नदीकाठच्या अनेक कुटुंबांना वेळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
काल दिवसभर बारामती शहरात मुसळधार पाऊस पडला. या पावसाने शहराच्या विविध रस्त्यांना अक्षरशः तळ्याचे स्वरुप आले होते. अनेक ठिकाणी सखल भाग पाण्याखाली गेला होता. दुचाकीस्वारांना या पाण्यातून कसरत करत मार्गक्रमण करावे लागत होते.
दरम्यान खंडोबानगर, वणवेमळा, पंचशीलनगर, म्हाडा कॉलनी, अनंत आशानगर, टकार कॉलनी या भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पुरामुळे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला असून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे.