कळंब व भवानीनगर येथील मृत कबड्डीपटुंच्या कुटुंबीयांचे हर्षवर्धन पाटील यांनी केले सांत्वन
इंदापूर रुग्णालयात जखमी कबड्डीपटुंची विचारपूस

कळंब व भवानीनगर येथील मृत कबड्डीपटुंच्या कुटुंबीयांचे हर्षवर्धन पाटील यांनी केले सांत्वन
इंदापूर रुग्णालयात जखमी कबड्डीपटुंची विचारपूस
इंदापूर:प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.22) कळंब येथे नुकत्याच विजापूर जिल्ह्यात झालेल्या दुर्देवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सोहेल इस्माईल सय्यद या कबड्डीपटुच्या कुटुंबीयांची तसेच भवानीनगर (भाग्यनगर) येथे महादेव बापू आवटे या मृत्युमुखी पडलेल्या दुसऱ्या कबड्डीपटुच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व कुटुंबीयांना धीर दिला.
कबड्डी स्पर्धेसाठी जात असताना विजापूर जिल्ह्यात खेळाडूंच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या सिद्धार्थ कांबळे व समीर शेख या कबड्डीपटूवर इंदापूर येथे खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या जखमी कबड्डीपटुंच्या प्रकृतीची हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली व कुटुंबियांशी संवाद साधला.
तसेच हर्षवर्धन पाटील यांनी कळंब येथे किरकोळ दुखापत झालेल्या अविष्कार कोळी याची भेट घेतली. यावेळी त्यांना अविष्कारने अपघाताची सविस्तरपणे माहिती दिली.
त्याचप्रमाणे हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.22) पुण्यात रुग्णालयात उपचार चालु असलेल्या गणेश कोळी, वैभव मोहिते, संदीप सूर्यवंशी या कबड्डीपटूंच्या प्रकृतीची दूरध्वनीवरून विचारपूस केली व कुटुंबीयांची संवाद साधला. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी डॉक्टरांशीही संपर्क साधला. दरम्यान, या कबड्डीपटूंच्या कुटुंबियांना लागेल ते सर्व सहकार्य व मदत करणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.