कळस (गुंजाळवस्ती) येथील नागरिकांची नवीन विद्युत रोहित्र बसवण्याची मागणी
सदरील विभागाने केले मागणीकडे दुर्लक्ष.
कळस (गुंजाळवस्ती) येथील नागरिकांची नवीन विद्युत रोहित्र बसवण्याची मागणी
सदरील विभागाने केले मागणीकडे दुर्लक्ष.
बारामती वार्तापत्र
कळस ( गुंजाळवस्ती) ता.इंदापूर येथील नागरिकांनी नवीन विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी सहाय्यक अभियंता यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
सध्या गुंजाळवस्ती येथे कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिकांच्या घरातील फ्रीज,टीव्ही,फॅन तसेच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कमी विद्युत प्रवाहामुळे येथील नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे चालण्यास अडथळे येत असल्या कारणाने नागरिक त्रस्त असून यातून सुटका होण्याकरिता त्यांनी जवळपास एक महिन्यापूर्वी उच्च दाबाचे रोहित्र बसविण्याची मागणी सदरील विभागाकडे केली आहे.
तरीदेखील आजतागायत त्यांनी केलेल्या मागणीकडे सदरील विभागाकडुन दुर्लक्ष करण्यात आले आहे.त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी नवीन रोहित्र बसवून ग्रामस्थांच्या होत असलेल्या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
सदरील अर्ज नुकसान झालेल्या नागरिकांच्या सह्यानिशी देण्यात आला आहे.