काटेवाडी चे रहिवासी व माई किसन मंच चे अध्यक्ष एकनाथराव काटे यांचे निधन
हृदयावरील शस्त्रक्रियेच्या उपचाराकरिता त्यांना पुण्यामध्ये दाखल करण्यात आली होते

काटेवाडी चे रहिवासी व माई किसन मंच चे अध्यक्ष एकनाथराव काटे यांचे निधन
हृदयावरील शस्त्रक्रियेच्या उपचाराकरिता त्यांना पुण्यामध्ये दाखल करण्यात आली होते
बारामती:वार्तापत्र
काटेवाडी येथील रहिवासी,प्रगतिशील बागायत दार,प्रसिद्ध प्रवचनकार व माई किसान मंचाचे प्रदेशाध्यक्ष एकनाथराव मारुतराव काटे यांचे आज शुक्रवार दि.30 एप्रिल रोजी पुण्यातील रुग्णाक्यात दुःखद निधन झाले आहे.
हृदयावरील शस्त्रक्रियेच्या उपचाराकरिता त्यांना पुण्यामध्ये दाखल करण्यात आली होते. ते 68 वर्षांचे होते.
काटे यांना रविवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची बायपास शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने आज दुपारी त्यांचे निधन झाले.
एकनाथ काटे यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात विविध पदावर काम केले. राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या राज्यस्तरीय मूल्यांकन समितीचे अध्यक्ष पदही त्यांच्याकडे होते. काटेवाडी च्या ग्रामस्वच्छता अभियानात त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता. काँग्रेस, भाजप राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांनी राजकीय प्रवास देखील केला आहे विविध क्षेत्रात त्यांचा संपर्क दांडगा होता
कृषी पदवीधरांच्या प्रश्नाबाबत त्यांनी दीर्घकाळ काम केले. प्रत्येक विषयातील त्यांचा गाढा अभ्यास यामुळे ते सुपरिचित होते. गेल्या काही वर्षांपासून ते भागवत संप्रदायात त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी प्रवचने ही दिली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.