‘कायद्यापेक्षा मोठे कोणीच नाही’;रस्ते अडवून वाहतुकीस अडसर ठरणाऱ्या १० दुकानदारांविरोधात बारामती वाहतूक पोलिसांचा मोठी कारवाई
असतील तर थेट 9923630652 यावर कळवा;चंद्रशेखर यादव

‘कायद्यापेक्षा मोठे कोणीच नाही’;रस्ते अडवून वाहतुकीस अडसर ठरणाऱ्या १० दुकानदारांविरोधात बारामती वाहतूक पोलिसांचा मोठी कारवाई
असतील तर थेट 9923630652 यावर कळवा;चंद्रशेखर यादव
बारामती वार्तापत्र
‘स्वतःचे दुकान मोठे असले, तरी कायद्यापेक्षा मोठे कोणीच नाही’ हे दाखवून देताना बारामती वाहतूक पोलिसांनी रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्या १० दुकानदारांविरोधात मोठी कारवाई केली.
या कारवाईमुळे दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
नेवसे रोड, स्टेशन रोड आणि पाटस रोड परिसरातील काही नामांकित दुकान चालकांनी रस्त्यावरच आपले राज्य मांडले होते, याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. कुठे दुचाकी दुरुस्ती, कुठे स्पेअर पार्ट्सची विक्री, तर कुठे चप्पल-कपड्यांचे स्टॉल्स यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. वाहतूक पोलिसांनी या दुकानांवर कारवाई केली त्यामध्ये कपूर ऑटो स्पेअर पार्ट्स, एक्झिक्यूटिव्ह ऑटोमोबाईल्स, ज्येनुनिई स्पेअर पार्ट्स, होरा ऑटो सेंटर (नेवसे रोड) एस के शूज, कियारा लाइफस्टाईल, न्यू भारत कलेक्शन, तिवारी फॅशन, भावना फॅशन (स्टेशन रोड), आदित्य शिव मार्ट (बिगवन चौक, पाटस रोड) केलेल्या कारवाईत या दुकानांचा समावेश आहे.
या सर्व दुकानांना यापूर्वीही वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या. पोलिसांनी साहित्य हटवले होते, पण ‘पोलीस गेले की पुन्हा तेच खेळ’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कारवाईचा धडाका लावला. सर्व अडथळा ठरणारे साहित्य ताब्यात घेतले होते, संबंधित दुकानदारांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत. आता या दुकानदारांना न्यायालयात हजर राहून दंडही भरावा लागणार आहे. ही कारवाई शहरातील अतिक्रमण करणाऱ्यांसाठी स्पष्ट इशारा ठरत असून कायद्याची थट्टा करणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक सुभाष काळे, पोलीस अंमलदार प्रदिप काळे, सुधाकर जाधव, अजिंक्य कदम, रेश्मा काळे, सिमा घुले, रूपाली जमदाडे, माया निगडे, स्वाती काजळे, दत्तात्रय भोसले. आकाश कांबळे, प्रज्योज चव्हाण आणि बारामती नगरपालिकेचे सागर भोसले संदीप किर्वे शंकर सोनवणे श्रीकांत सूर्यवंशी यांनी केली आहे.
‘रस्ता ही सार्वजनिक मालमत्ता आहे,त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांना सुलभ प्रवास करता यावा यासाठी वाहतूक विभाग अधिकची काळजी घेत आहे.वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी समुपदेशन करत आहे. यापुढे अशा प्रकारे रस्ता अडवून व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, काही तक्रारी असतील तर थेट 9923630652 यावर कळवाव्यात.
~ चंद्रशेखर यादव