कारगिल विजय दिना निमित्त शहिद जवानांना श्रद्धांजली.
जय जवान आजी माजी सैनिक संघटना च्या वतीने कार्यक्रम संपन्न.
कारगिल विजय दिना निमित्त शहिद जवानांना श्रद्धांजली.
जय जवान आजी माजी सैनिक संघटना च्या वतीने कार्यक्रम संपन्न.
बारामती:वार्तापत्र बारामती तालुका जय जवान आजी माजी सैनिक संघटना यांच्या वतीने कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.भिगवण चौक येथील हुतात्मा स्तंभास अभिवादन करण्यात आले व भारत माता की जय ,वीर जवान अमर रहे आदी घोषणा देऊन राष्ट्रगीत सादर करण्यात आले.या वेळी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत नींबाळकर यांच्या सहित शहर व तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी व आजी माजी सैनिक उपस्तीत होते.
“युद्ध होऊन जातात, भूप्रदेश जिंकले किंवा हरले जातात. काही जणांचा वरचष्मा होतो तर काहींची उचलबांगडी होते. काही महत्त्वाकांक्षी डोकी सुखावतात तर काही महत्वाकांक्षी डोकी कायमचीच दुखावतात. आपल्या देशाचे प्राणपणानं रक्षण करण्यासाठी मृत्यूलाही हसत हसत सामोरे जाणारे जवान, ज्यांच्या शौर्याचे वर्णन केवळ शब्दांत कुणी मांडूच शकत नाही. देशासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या त्या वीरांना सलाम, आणि कधीही या वीरांच्या कर्तव्याच्या आड न येणाऱ्या त्यांच्या परिवाराला देखील सलाम. यात वाईट फक्त याचं गोष्टीचे वाटते की आपल्याला या जवानांच्या बलिदानाची जाण फक्त याचं व अशाच दिवशी का होते. हीच जाण कायम रहावी ही अपेक्षा आहे ” असे संघटनेचे अध्यक्ष हनुमंत नींबाळकर यांनी सांगितले. आभार सचिव राहुल भोईटे यांनी मानले.