काऱ्हाटी संकुलात गुणोत्सव 2024 या विविध कलागुणदर्शन स्पर्धेचे आयोजन
आपल्यामधील सुप्त कलागुणांना वाव देण्याचे आवाहन सं

काऱ्हाटी संकुलात गुणोत्सव 2024 या विविध कलागुणदर्शन स्पर्धेचे आयोजन
आपल्यामधील सुप्त कलागुणांना वाव देण्याचे आवाहन सं
बारामती वार्तापत्र
कृषि उद्योग मूल शिक्षण संस्था, काऱ्हाटी च्या संकुलामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने आदरणीय सौ. सुनेत्रावहिनीसाहेब पवार(खासदार, राज्यसभा, भारत सरकार) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “गुणोत्त्सव 2024″…..उधळण कलागुणांची (वर्ष 2 रे) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेअंतर्गत जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय अशा विविध कलागुणदर्शन स्पर्धांचे आयोजन दिनांक- 29 नोव्हेंबर 2024 वार-शुक्रवार सकाळी 8.00 वाजल्यापासून काऱ्हाटी संकुलातील विविध विभागामध्ये करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये सुंदर हस्ताक्षर, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, निबंध लेखन स्पर्धा, फलक लेखन व चित्रण तसेच स्किल रील्स स्पर्धाचा समावेश आहे.
या स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थांना पारितोषिके,सन्मानचिन्हे व सर्व सहभागी विद्यार्थांना प्रशस्तीपत्रके देण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री. विकास निर्मल यांनी दिली आहे.
तसेच या स्पर्धामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ आपल्यामधील सुप्त कलागुणांना वाव देण्याचे आवाहन संस्थेचे सचिव श्री. प्रफुल्ल तावरे यांनी केले आहे.